नागपूर
Saraswati Shishu Mandir सरस्वती शिशु मंदिर, नंदनवन येथे शैक्षणिक सत्र २०२६-२७ चाशैक्षणिक सत्र २०२६-२७ उत्साहपूर्ण वातावरणात झाला. नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे सनईच्या मंगल सुरात औक्षण, पुष्पवृष्टी आणि खाऊ वाटप करून स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष धाराशिवकर सर व सचिव तुंगार प्रमुख उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देत नियमित अभ्यासासोबतच संस्कार, शिस्त आणि सर्वांगीण विकासाचे महत्त्व अधोरेखित केले.प्रधानाचार्या पुष्पा बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वागत समारंभ पार पडला.Saraswati Shishu Mandir आकर्षक सजावटीने नटलेल्या विद्यालयात नवागत विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण होते. यावेळी शिक्षक, कर्मचारी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौजन्य;अश्विनी बोरकर,संपर्क मित्र