नागपूर,
saraswati vidyalayas सरस्वती विद्यालय हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, शंकरनगर येथे मंगळवारी (३० जून) नवीन शैक्षणिक सत्र २०२६-२७ चा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे पुष्पवर्षाव करून स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांनी ‘स्कूल चले हम’ या गीतावर नृत्य सादर केले. संगीत शिक्षिका रूपाली बक्षी यांनी मंत्रपठण केले. मुख्याध्यापिका लक्ष्मी श्रीनिवासन यांनी स्वागतपर भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी उपमुख्याध्यापिका शैली अय्यर, पर्यवेक्षक रवींद्र कुळकर्णी व राहुल घोडे उपस्थित होते.

इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांची त्यांच्या वर्गशिक्षकांशी औपचारिक ओळख करून देण्यात आली. या उपक्रमातून प्राथमिक ते माध्यमिक शाळेतील संक्रमण सुलभ करण्याचा प्रयत्न करण्यात आला. साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष टी. के. व्यंकटेश, सचिव व्ही. मीनाक्षी, नियामक मंडळाचे सदस्य, शाळांचे प्रमुख व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे संचालन मेघा व्यास यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. यानंतर विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटप करण्यात आले.
सौजन्य:अनघा पेंडके,संपर्क मित्र