विश्वकरंडकात सौदी-कतारचा फुसका बार

    दिनांक :30-Jun-2026
Total Views |
कतार,
Saudi Arabia and Qatar's World Cup सध्या सुरू असलेल्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत आखाती देशांची निराशाजनक कामगिरी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. फुटबॉल पायाभूत सुविधांवर अब्जावधींची गुंतवणूक, जागतिक दर्जाचे प्रशिक्षक आणि स्टार खेळाडूंना मोठमोठे करार देऊनही सौदी अरेबिया आणि कतार यांना अपेक्षित यश मिळवता आलेले नाही. त्यामुळे केवळ पैसा ओतून जागतिक फुटबॉलमध्ये यश विकत घेता येत नाही, हे पुन्हा स्पष्ट झाले आहे. विशेषतः सौदी अरेबियाकडून यंदाच्या स्पर्धेत मोठ्या अपेक्षा होत्या. देशांतर्गत लीगमध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डो, नेमार आणि करीम बेंझेमायांसारख्या जागतिक दर्जाच्या खेळाडूंना प्रचंड मानधन देत क्लबशी जोडण्यात आले आहे. तसेच 2034 च्या विश्वकरंडक स्पर्धेचे यजमानपदही सौदी अरेबियाकडे आहे. मात्र, मैदानावर त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला नाही.
 
 
World Cup
 
सौदी अरेबियासाठी सर्वात मोठा धक्का म्हणजे त्यांच्या गटातील छोट्या केप व्हर्डी संघाची कामगिरी. प्रथमच विश्वकरंडकासाठी पात्र ठरलेल्या केप व्हेर्देने बाद फेरीत प्रवेश केला, तर सौदी अरेबियाला साखळी फेरीतच स्पर्धेबाहेर व्हावे लागले. अखेरच्या साखळी सामन्यात केप व्हेर्देने सौदी अरेबियाला गोलशून्य बरोबरीत रोखले आणि 1994 नंतर पुन्हा बाद फेरी गाठण्याचे त्यांचे स्वप्न भंगले. गतवेळच्या विश्वकरंडकाचे यजमान असलेल्या कतारची परिस्थितीही फार वेगळी नव्हती. तीन साखळी सामने खेळल्यानंतर कतारचे आव्हानही संपुष्टात आले. स्वित्झर्लंड विरुद्धच्या सामन्यात अखेरच्या क्षणी गोल करत त्यांनी सामना बरोबरीत सोडवला, मात्र स्पर्धेत टिकण्यासाठी ते अपुरे ठरले.
 
 
कतारचे प्रशिक्षक ज्युलन लोपेटेगुई मन्यात अखेरच्या क्षणी गोल करून आम्ही किमान अशा सामन्यांत लढत देऊ शकतो याचे समाधान मिळाले.” स्पेन आणि रियल माद्रिदचे माजी प्रशिक्षक असलेल्या लोपेटेगुई यांच्या अनुभवाचा संघाला फारसा फायदा झालेला दिसला नाही.इराण आणि इतर आखाती संघांचीही जवळपास अशीच अवस्था झाली. याउलट आफ्रिकन संघांनी दमदार कामगिरी करत लक्ष वेधले. 10 पैकी 9 आफ्रिकन संघांनी अंतिम 32 मध्ये स्थान मिळवले, ही बाब विशेष ठरली. कतार हा अवघ्या 30 लाख लोकसंख्येचा देश असला तरी आशियाई फुटबॉलमध्ये त्यांचा मोठा दबदबा आहे. सलग दोनदा त्यांनी आशिया करंडक जिंकला असून जपान आणि दक्षिण कोरिया यांसारख्या बलाढ्य संघांवरही मात केली आहे. मात्र, जागतिक स्तरावर त्यांची हीच ताकद पूर्णपणे निष्प्रभ ठरताना दिसत आहे. सौदी अरेबियाचे प्रशिक्षक जॉर्जियो डोनिस यांनी संघाच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करत सांगितले की, आपल्याएवढीच क्षमता असलेल्या संघांविरुद्ध खेळतो तेव्हा उत्तम कामगिरी होणे अपेक्षित असते, परंतु अशा वेळीही संघाचा खालावलेला खेळ चिंता करणारा असतो. एकूणच, फुटबॉलमधील आर्थिक ताकद आणि भव्य गुंतवणूक ही यशाची हमी देत नाही, हे सौदी अरेबिया आणि कतारच्या अपयशातून पुन्हा अधोरेखित झाले आहे.