कारंजा (घा),
shivas coronation day at karanja चक्रवर्ती राजा भोज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख वते म्हणून राजकुमार तिरभाने यांची उपस्थिती होती. तर अध्यक्षस्थानी प्राचार्य एस. आर. कृष्णापुरकर होते. यावेळी प्रा. डी. एम. डांगोरे, प्रा. टी. एम. पडोळे यांची उपस्थिती होती.
तिरभाने म्हणाले की, शिवराज्याभिषेक हा हिंदुस्थानचा राष्ट्रीय उद्घोष आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकामुळे त्याकाळी दूरगामी परिणाम झाले व राष्ट्रीयत्वाचे बीज रोवले गेले. हा राज्याभिषेक केवळ महाराजांचा नसून इथल्या प्रत्येक रयतेचा होता. हीच प्रेरणा पुढे पानिपतच्या युद्धाला व भारतीय स्वातंत्र्यलढ्याला आधार ठरली. भारताच्या इतिहासातील सुवर्णक्षण म्हणजे शिवराज्याभिषेक. याच दिवशी हिंदवी स्वराज्याची अधिकृत घोषणा झाली. शिवराई व होन ही नवी चलने सुरू झाली आणि शिवराज्याभिषेक शक सुरू करण्यात आल्याचे ते म्हणाले. संचालन प्रा. डी. एम. डांगोरे यांनी केले.