उमियाशंकर नारायणजी हायस्कूलमध्ये प्रवेशोत्सव उत्साहात

    दिनांक :30-Jun-2026
Total Views |
नागपूर,
Shri Umiyashankar Narayanji High School श्री उमियाशंकर नारायणजी हायस्कूलमध्ये शैक्षणिक सत्र २०२६-२७ चा विद्यार्थी प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. नव्या विद्यार्थ्यांचे मिठाई देऊन स्वागत करण्यात आले.
 
 
anshul
 
 
 
कार्यक्रमाला श्री नागपूर गुजराती मंडळाचे खेतालाल पटेल, विनोद पटेल, लकडगंज वार्डाचे नगरसेवक संजय अवचट, नागपूर शहर युवा मोर्चाचे उपाध्यक्ष नितीन इटनकर, गांधीबाग झोनच्या सभापती उमा देशमुख, नगरसेवक श्रीकांत आगलावे तसेच मुख्याध्यापिका गुप्ता उपस्थित होत्या.विद्यार्थ्यांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले. तसेच नव्या विद्यार्थ्यांच्या पालकांची बैठक घेऊन संपूर्ण शैक्षणिक सत्रातील उपक्रमांची माहिती देण्यात आली.
सौजन्य:अंशुल जिचकार,संपर्क मित्र