अमरावती,
bjp-city-president : प्रदेश भाजपाने सोमवारी अमरावती शहराध्यक्षपदी डाॅ. नितीन धांडे यांच्या जागेवर नितीन गुडधे यांची नियुक्ती केली होती. या नियुक्तीला मंगळवारी दुपारी स्थगिती देण्यात आली. तसे पत्र काढण्यात आले आहे. डाॅ. धांडे अध्यक्षपदी कायम राहणार आहे.
अमरावती ग्रामीण (मोर्शी) जिल्हाध्यक्षपदावरून रविराज देशमुख व शहराध्यक्ष पदावरून डाॅ. धांडे यांना बाजुला करण्यात आले होते. त्यांच्या जागोवर अनुक्रमे आमदार प्रताप अडसड आणि नितीन गुडधे यांची नियुक्ती करण्यात आली होती. यापैकी नितीन गुडधे यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे. आश्चर्यकारपणे घडलेल्या या घटनाक्रमाने भाजपा कार्यकर्त्यांमध्ये कमालीची चर्चा सुरू आहे.