तभा शताब्दीची शिकवन; वटपौर्णिमेला तुळशी लागवड अभियान

* कायस्थ समाजाचा पुढाकार

    दिनांक :30-Jun-2026
Total Views |
वर्धा, 
vat-purnima : तरुण भारतच्या वतीने गेल्या वर्षी शताब्दी वर्षानिमित्त तुळशी दान आणि रोपन अभियान संपुर्ण विदर्भात राबवण्यात आला. त्याच अभियानापासुन बोध घेत येथील कायस्थ समाजाच्या वतीने वटसावित्रीला तुळसी रोपांचे वाटप करण्यात आले. १ हजार तुळशी वाटपाचा संकल्प समाजाचे अध्यक्ष कामना श्रीवास्तव यांनी व्यत केला.
 
 
 
j
 
 
 
हिंदू समाजामध्ये तुळशीला धार्मिक महत्त्व आहे. यासोबत आयुर्वेदातही औषधी वनस्पती म्हणुन तुळशीचा वापर केला जातो. या पवित्र आणि सर्वाधिक प्राणवायू देणार्‍या तुळशी रोपन सर्वत्र व्हावे यासाठी प्रत्येक घरात तुळस हा संदेश देत वट पौर्णिमेला कायस्थ समाज वर्धेचे अध्यक्ष कामना श्रीवास्तव यांनी विविध ठिकाणी वैयक्तिक भेट देऊन तुळशीच्या रोपांचे वाटप केले. १ हजार झाडं लावण्याच्या उपक्रमांतर्गत, त्यांनी विविध ठिकाणी महिलांची भेट घेऊन त्यांना आपल्या संकल्पाची माहिती दिली. अनेक महिलांनी या अभियानात उत्साहाने सहभागी होण्याची इच्छा व्यत केली.
 
 
या उपक्रमांतर्गतन श्रीवास्तव यांनी निर्मल उज्ज्वल बँकेचे कर्मचारी, ग्राहक तसेच बसस्थानक परिसरात महिला वाहकांना तुळशीच्या रोपांचे वाटप केले. लोकांना वृक्षारोपण आणि संवर्धनाबद्दल माहिती देणे. प्रत्येक ठिकाणी जवळपास १५० ते २०० लोकांना या उपक्रमाबद्दल माहिती देण्यात आली आणि श्रमदान करून सहभागी होण्यास सांगितले. कायस्थ समाजाचे सदस्य आणि इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी या अभियानात सहभाग घेतला.