देवळी,
vaigaon youth dies स्थानिक तडस आयटीआयसमोर दुचाकी अपघातात मयूर भेंडारे (२४) रा.वायगाव (नि) या युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज मंगळवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास झाली. मिळालेल्या माहितीनुसार, मयूर भेंडारे हा एमआयडीसीतील कंपनीतून रात्रपाळी करून दुचाकीने वाभगावकडे जात होता. नवीन तयार करण्यात येत असलेल्या रस्त्यावरील दुभाजकांसाठी सोडलेल्या जागेतील मातीवरून दुचाकी घसरल्याने हा अपघात झाला. मयूरने घातलेले हेल्मेट तुटले आणि डोयाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दरम्यान गृहरक्षक अधिकारी नरेश जोशी यांच्या निदर्शनास हा अपघात आला. त्यांनी तात्काळ ११२ आपत्कालीन सेवा तसेच पोलिस ठाण्याला माहिती दिली. देवळी पोलिसांनी या अपघाताची नोंद घेतली आहे.