विदर्भ पान नगराध्यक्षाच्या टेबलवर फेकला कचरा

    दिनांक :30-Jun-2026
Total Views |
पुलगाव, 
vidarbha-municipal-council-president : वॉर्डातील कचर्‍याची वेळीच योग्य विल्हेवाट लावली जात नसल्याचा आरोप करीत सोमवार २९ रोजी विशेष सभेदरम्यान विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी नगराध्यक्षांच्या टेबलवर कचरा टाकून निषेध केला.
 
 
j
 
नगराध्यक्ष कविता ब्राह्मणकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांना सोमवारी घटनेनंतर निवेदन सादर करण्यात आले आहे. या निवेदनात, २९ जूनला पुलगाव नगर परिषदेत विशेष सभेदरम्यान विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी नगराध्यक्ष व उपाध्यक्षांच्या टेबलवर कचरा टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिवाय हा प्रकार सभागृहातील कामकाजात अडथळा निर्माण करणारा असल्याने संबंधित कृत गैरवर्तन ठरणारे असल्याने दोषींवर कारवाई करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
 
 
 
सभागृहात विशेष सभेतील विषयांवर चर्चा सुरू असताना विरोधी पक्षाचे गटनेते प्रवीण पनिया, नगरसेवक दुर्गेश यादव, आकाश कागडे यांनी सभेच्या विषयांव्यतिरिक्त अन्य कारणांवरून मोठ्याने आरडा-ओरडा करून सभेच्या कामकाजात अडथळा निर्माण केला. त्यांनी नगराध्यक्ष व उपाध्यक्षांच्या आसनाजवळ जात वाद घातला. ते इतयावर थांबले नाही तर त्यांनी नगराध्यक्ष व उपाध्यक्षांच्या टेबलवर दोन पोती कचरा व नालीतील सांडपाणी टाकून सभागृहाची पवित्रता भंग केल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आले.
 
 
वारंवार सूचना देऊनही नगरपरिषद प्रशासनाने वॉर्डातील कचर्‍याची वेळीच विल्हेवाट लावली नाही. त्यामुळे पालिका प्रशासनाला जागे करण्यासाठी आक्रमक पवित्रा आम्हाला घ्यावा लागला. कचर्‍याची वेळीच योग्य विल्हेवाट लागली पाहिजे, अशी प्रतिक्रिया गटनेता प्रवीण पनिया यांनी दिली.