'वेलकम टू द जंगल'ने अवघ्या ४ दिवसांत वसूल केले बजेट!

    दिनांक :30-Jun-2026
Total Views |
मुंबई,
welcome-to-the-jungle : बॉलिवूडचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित मल्टिस्टारर चित्रपट 'वेलकम टू द जंगल' सध्या बॉक्स ऑफिसवर सुसाट धावताना दिसत आहे. प्रदर्शनानंतरच्या पहिल्या सोमवारची म्हणजेच चौथ्या दिवसाची कठीण परीक्षा या चित्रपटाने यशस्वीपणे पार पाडली असून आपली पकड मजबूत ठेवली आहे. प्रेक्षकांच्या तुफान प्रतिसादामुळे या चित्रपटाने अवघ्या चार दिवसांत जगभरात तब्बल १०६ कोटी रुपयांची बंपर कमाई केली आहे.
 
 
welcome-to-the-jungle
 
 
हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ज्या वेगाने कमाई करत आहे, ते पाहता हा चित्रपट लवकरच स्वतःचा निर्मिती खर्च (बजेट) वसूल करेल, असा विश्वास चित्रपट विश्लेषकांकडून व्यक्त केला जात आहे. वीकेंड संपल्यानंतरही सोमवारच्या दिवशी प्रेक्षकांनी थिएटर्समध्ये गर्दी केल्यामुळे चित्रपटाचे कलेक्शन दमदार झाले आहे. विनोदाची तडाखेबंद मेजवानी आणि तगडी स्टारकास्ट यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना थिएटरकडे खेचून आणण्यात यशस्वी ठरला असून, आगामी दिवसांत हा चित्रपट कमाईचे आणखी नवे विक्रम प्रस्थापित करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.