बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट पुन्हा बोहल्यावर?

गौरी स्प्रॅटसोबतच्या लग्नाच्या चर्चांना उधाण

    दिनांक :04-Jun-2026
Total Views |
मुंबई
Aamir Khan बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान पुन्हा एकदा आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून आमिर खान आणि गौरी स्प्रॅट यांच्या नात्याबाबत विविध चर्चा रंगत असताना आता त्यांच्या संभाव्य विवाहाची माहिती समोर आल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
 

Aamir Khan 
आमिर खान आणि गौरी स्प्रॅट येत्या ५ जुलै रोजी नोंदणीकृत पद्धतीने विवाह करू शकतात. हा सोहळा अत्यंत साध्या आणि कौटुंबिक वातावरणात पार पडण्याची शक्यता असून त्यासाठी केवळ कुटुंबातील सदस्य आणि काही निवडक मित्रांना आमंत्रित करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. कोणताही मोठा गाजावाजा न करता आपले नाते अधिकृत करण्याचा निर्णय या दोघांनी घेतल्याची चर्चा आहे. विवाहसोहळा आमिर खानच्या निवासस्थानीच आयोजित केला जाऊ शकतो. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे या चर्चांमध्ये कितपत तथ्य आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, या संभाव्य विवाहसोहळ्याला Aamir Khan बॉलिवूडमधील काही नामवंत कलाकार उपस्थित राहू शकतात, अशीही चर्चा रंगली आहे. विशेषतः आमिरचे जवळचे मित्र सलमान खान आणि शाहरुख खान या सोहळ्यात सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या विवाहाकडे केवळ चित्रपटसृष्टीच नव्हे, तर चाहत्यांचेही विशेष लक्ष लागले आहे.सध्या मात्र आमिर खान किंवा गौरी स्प्रॅट यांनी लग्नाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे ५ जुलै रोजी विवाह होणार असल्याच्या चर्चांची सत्यता येत्या काही दिवसांत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.