आमिर खान पुन्हा बोहल्यावर चढणार?

    दिनांक :04-Jun-2026
Total Views |
मुंबई,
Aamir Khan is going to get married बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखला जाणारा आमिर खान पुन्हा एकदा आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्याचे नाव गौरी स्प्रॅटसोबत जोडले जात असून, आता हे दोघे लवकरच विवाहबंधनात अडकू शकतात, अशी चर्चा रंगू लागली आहे. या चर्चेमुळे गौरी स्प्रॅट कोण आहे, तिची पार्श्वभूमी काय आहे आणि आमिरसोबतचे तिचे नाते नेमके कसे आहे, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.आमिर खानने आपल्या वाढदिवसानिमित्त माध्यमांसमोर गौरी स्प्रॅटची ओळख करून दिल्यानंतर या नात्याबद्दलची चर्चा अधिकच वाढली. विविध माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार, हे जोडपे आपल्या नात्याला अधिकृत रूप देण्याच्या तयारीत असून जुलै महिन्यात एका अत्यंत साध्या आणि खाजगी समारंभात विवाह करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याबाबत अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.
 
 

aamir and gauri 
माहितीनुसार, आमिर आणि गौरी गेल्या काही काळापासून एकमेकांच्या जवळ असून त्यांनी आपल्या नात्याला वेळ दिला आहे. दोघेही प्रसिद्धीपासून दूर राहून वैयक्तिक आयुष्य खासगी ठेवण्यास प्राधान्य देत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे संभाव्य विवाहसोहळाही अत्यंत मर्यादित उपस्थितीत पार पडू शकतो, अशी चर्चा आहे.गौरी स्प्रॅट मूळची बंगळूर येथील असून ती बहुसांस्कृतिक वारसा असलेल्या कुटुंबातून येते. तिचे कुटुंब भारतीय आणि ब्रिटिश परंपरांचा संगम मानले जाते. विविध सांस्कृतिक पार्श्वभूमी असूनही गौरी स्वतःची ओळख भारतीय म्हणूनच अभिमानाने मांडते. तिच्या कुटुंबाचा इतिहास आणि भारताशी असलेले नातेही विशेष मानले जाते. दरम्यान, आमिर खानच्या वैयक्तिक आयुष्याबाबत चाहत्यांमध्ये नेहमीच उत्सुकता राहिली आहे. याआधी त्याचे दोन विवाह झाले असून आता गौरी स्प्रॅटसोबतच्या नात्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. सोशल मीडियावरही या संभाव्य विवाहाबाबत विविध चर्चा रंगताना दिसत आहेत.