अमरावतीत तिरंगी लढत होणार

    दिनांक :04-Jun-2026
Total Views |
विधान परिषदेची निवडणूक
एकूण ४५३ उमेदवार
 
अमरावती, 
Amravati Legislative Council विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी प्रमुख तिन्ही पक्षाचे उमेदवार रिंगणात राहील्याने तिरंगी लढत होणार आहे. १८ जून रोजी मतदान होणार्‍या या निवडणुकीसाठी एकूण ४५३ मतदार जिल्ह्यातल्या ७ मतदान केंद्रांवर मतदान करणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी आशिष येरेकर यांनी गुरूवारी दिली.
 
 
ant
 
नामांकन अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. दुपारी ३ वाजेपर्यंत अपक्ष उमेदवार प्रशांत महल्ले यांनीच अर्ज मागे घेतल्यामुळे आता रिंगणात भाजपाचे प्रवीण पोटे, काँग्रेसचे हर्षजित देशमुख व वंचित बहुजन आघाडीचे निलेश विश्वकर्मा कायम आहे. त्यामुळे अमरावतीत तिरंगी लढत स्पष्ट झाली आहे. त्या पृष्ठभूमिवर प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीसाठी धारणीत ४३, अचलपुरता ६९, मोर्शीत ८१, दर्यापुरता ६१, तिवस्यात ३८, अमरावतीत ९५, चांदूर रेल्वेत ६६ मतदार मतदान करणार आहे. ४५३ मतदारांपैकी २२७ महिला मतदार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर सात अधिकारी नेमण्यात आले आहे. २२ जून रोजी या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे.
 
 
 
Amravati Legislative Council  लढत स्पष्ट झाल्यामुळे तिन्ही उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी आज दुपारपासूनच सुरू केल्या. काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या लगातार बैठका सुरू आहे. गेल्या निवडणुकीतला डाग पुसण्याचे मोठे आव्हान काँग्रससमोर असल्याने सर्व नेते कामाला लागले आहे. काँग्रेसचे मते फुटणार नाही उलट इतर पक्षाची मते आपल्याकडे वळविण्यासाठी प्रयत्न सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. भाजापाने आपली तयारी नेहमी प्रमाणे सुरू ठेवली आहे. भाजपा उमेदवार प्रवीण पोटे यांना या निवडणुकीचा चांगला अनुभव आहे. गेल्या निवडणुकीत ते सर्व पक्षीय मतदारांची विक्रमी मते घेऊन विजयी झाले होते. यंदाही त्याच पद्धतीने मते मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो आहे. नेत्यांच्या मदतीने प्रवीण पोटे यांनी रणनिती आखणे सुरू केले आहे. तिसरे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांनी देखील मतदारांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहे. काँग्रेसने वंचितसाठी हा मतदारसंघ सोडावा यासाठी प्रयत्न सुरू होते. अद्याप निर्णय झालेला नाही. चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
अविरोधसाठी झाले प्रयत्न
अमरावतीची निवडणूक अविरोध व्हावी, यासाठी महायुतीकडून शेवटपर्यंत प्रयत्न झाले. वरिष्ठस्तरावरून फोनाफानी झाली. वेळेपर्यंत तोडगा न निघाल्यामुळे निवडणूक होणे निश्चित झाले आहे.