सहाव्या मजल्यावरून उडी घेऊन ऑटो चालकाची आत्महत्या

    दिनांक :04-Jun-2026
Total Views |
प्रवाशांना सोडल्यानंतर ऑटो चालकाचे टोकाचे पाऊल

अनिल कांबळे
नागपूर
Auto driver suicide म्हाडा कॉलनी परिसरात प्रवाशांना सोडल्यानंतर एका ऑटो रिक्षा चालकाने इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून खाली उडी मारून आत्महत्या केली. शांतीनगर भागात गुरुवारी दुपारी ही घटना घडली. मुलीधर हिंगे (६०, डायमंडनगर) असे मृत ऑटो चालकाचे नाव आहे.
 

Auto driver suicide 
 
Auto driver suicide  माहितीनुसार, मुलीधर हे गुरुवारी दुपारी १२.१५ वाजताच्या सुमारास काही प्रवाशांना घेऊन शांतीनगर येथील म्हाडा क्वार्टरमध्ये गेले होते. प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी सोडल्यानंतर ते तिथून निघून गेले. मात्र, काही वेळातच ते पुन्हा त्याच म्हाडा इमारतीपाशी परत आले. कोणालाही काही समजण्याच्या आत त्यांनी थेट इमारतीचा ६ वा मजला गाठला आणि तिथून खाली उडी घेतली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. नागरिकांनी तातडीने या प्रकरणाची माहिती शांतीनगर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेहाची तपासणी केली असता, त्यांच्याजवळ एक मोबाईल फोन मिळून आला. या मोबाईलमधील नंबरवरून मृत व्यक्तीची ओळख ऑटो चालक मुरलीधर हिंगे अशी पटली. पोलिसांनी तात्काळ त्यांच्या कुटुंबीयांना संपर्क साधून या घटनेची माहिती दिली आहे. मुरलीधर यांनी एवढे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पैशांच्या देवाणघेवाणीवरून प्रवाशांशी झालेल्या वादामुळे त्यांनी रागाच्या भरात हे कृत्य केले असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात होता. परंतु पोलिसांनी सध्या तरी असा कोणताही वाद झाल्याचा स्पष्ट नकार दिला आहे.