भाजपाचे अरूण लाखाणी यांची अविरोध निवड

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक

    दिनांक :04-Jun-2026
Total Views |

Bharatiya Janata Party
 
 
चंद्रपूर,
BJP's Arun Lakhani Elected Unopposed वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार अरुण लाखानी यांची आता महाराष्ट्र विधान परिषदेवर अविरोध निवड झाली आहे. कारण, या निवडणुकीत त्यांच्याविरोधात उभे असलेले कॉंग्रेसचे उमेदवार शैलेश अग्रवाल आणि अपक्ष उमेदवार सुधीरचंद्र कोठारी या दोघांनीही त्यांचे नामांकन माघे घेतले आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने अरुण लाखानी यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्या विरोधात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शैलेश अग्रवाल आणि अपक्ष सुधीरचंद्र कोठारी हे निवडणूकीच्या मैदानात होते. मात्र, आज, 4 जून रोजी उमेदवारी मागे घेण्याचा शेवटच्या दिवशी अग्रवाल आणि कोठारी या दोघांनीही अचानकपणे आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे अरुण लाखानी यांची अविरोध निवड निश्चित झाली. निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी त्यांची निवड अधिकृतरीत्या घोषित केली आहे. अरुण लाखानी हे श्री नरकेसरी प्रकाशन लिमिटेडचे माजी अध्यक्ष आहेत.