गोवंशाची हत्या करून अवशेष फेकणार्‍या वर कठोर कारवाई करा

    दिनांक :04-Jun-2026
Total Views |
मानोरा, 
Cattle Slaughter Case तालुयातील कुपटा या गावात ३० मे रोजी अज्ञात आरोपींनी गोवंशाची (गोमाता) हत्या करून तिचे मुखावशेष सार्वजनिक ठिकाणी फेकून अवयवाची अवहेलना करून धार्मिक भावना दुखावणार्‍या आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन विश्व हिंदू परिषद मानोरा प्रखंडच्या पदाधिकार्‍यांच्या वतीने पोलिस प्रशासनाला देण्यात आले.
 
 
Cattle
 
Cattle Slaughter Case  मानोरा तालुयासह वाशीम जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात गोवंश तस्करी, हत्या व गोमांस वाहतूक होत असल्याचे अनेक तक्रारी समोर येत असून असे अवैध प्रकार बंद करून बेकायदेशीर कृत्य करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सुद्धा निवेदनकर्त्यांनी निवेदनात नमूद केली आहे. मनोरा पोलिस निरीक्षकांना निवेदन देताना विश्व हिंदू परिषद मानोरा प्रखंडचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.