डॉ. नितीन खर्चे यांना पर्यावरण रक्षक पुरस्कार

    दिनांक :04-Jun-2026
Total Views |
यवतमाळ :
Dr. Nitin Kharche यवतमाळ ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त यवतमाळ अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. नितीन खर्चे यांना जलसंधारण विषयक अतुलनीय कार्यासाठी ‘पर्यावरण रक्षक पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे.
 
 
kharche
 
Dr. Nitin Kharche  पर्यावरण दिनानिमित्त शुक्रवार, 5 जून रोजी संध्याकाळी 5 वाजता ज्येष्ठ नागरिक भवनात होणाèया या कार्यक्रमात अंगणातील बगिचा स्पर्धेचेही पुरस्कार वितरण होणार आहे. उपवनसंरक्षक धनंजय वायभासे, पक्षीतज्ञ डॉ. प्रवीण जोशी व ज्येष्ठ नागरिक मंडळाचे मुख्य सल्लागार बळवंत चिंतावार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाèया या कार्यक्रमाला यवतमाळकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष राजन टोंगो यांनी केले आहे.