देशातील पहिले इलेक्ट्रॉनिक उत्पादन केंद्र

२ हजार कोटींची गुंतवणूक, ५ हजार रोजगारांची अपेक्षा

    दिनांक :04-Jun-2026
Total Views |
पुणे
Electronics Manufacturing Cluster राज्यातील पहिले आणि देशातील महत्त्वाचे मानले जाणारे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर पुणे जिल्ह्यातील रांजणगाव औद्योगिक क्षेत्रात उभारण्यात आले आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या पथदर्शी योजनेअंतर्गत उभारण्यात आलेला हा प्रकल्प पुढील दोन महिन्यांत कार्यान्वित होणार असल्याची माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) देण्यात आली आहे.
 

Electronics Manufacturing Cluster  
या प्रकल्पासाठी रांजणगाव औद्योगिक क्षेत्राची निवड २०२२ मध्ये अंतिम करण्यात आली होती. २९७ एकरांवर उभारण्यात आलेल्या या केंद्रासाठी एकूण ४९२ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला असून त्यातील निम्मा निधी केंद्र सरकारकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे. या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या तयार सुविधा विकसित करण्यात आल्या असून उद्योगांना अल्प कालावधीत उत्पादन सुरू करण्याची सुविधा मिळणार आहे.
 
 
या इलेक्ट्रॉनिक उत्पादन Electronics Manufacturing Cluster  केंद्राच्या माध्यमातून सुमारे ५० ते ६० कंपन्या येथे गुंतवणूक करण्याची शक्यता असून एकूण २ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. यामुळे सुमारे ५ हजार प्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. प्रकल्पाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच काही कंपन्यांनी गुंतवणूक करून उत्पादन सुरू केले असून त्यामुळे या केंद्राची औद्योगिक क्षमता स्पष्ट होत आहे.यामध्ये आयएफबी रेफ्रिजरेशन या कंपनीने ४५० कोटी रुपयांची गुंतवणूक करून १ हजार २०० रोजगार निर्माण केले आहेत. तर स्टॅरियन एचके इंडिया या कंपनीने १७५ कोटी रुपयांची गुंतवणूक करत ३२० रोजगार उपलब्ध करून दिले आहेत. पुढील काळात आणखी अनेक इलेक्ट्रॉनिक कंपन्या या क्लस्टरमध्ये गुंतवणूक करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे उद्योगांसाठी ‘रेडी टू यूज’ सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. साधारणपणे एखाद्या उद्योगाला जमीन विकसित करून उत्पादन सुरू करण्यासाठी एक ते दोन वर्षांचा कालावधी लागतो. मात्र या केंद्रात तयार सुविधा उपलब्ध असल्याने केवळ एका महिन्यात उत्पादन सुरू करणे शक्य होणार आहे.मुंबई–बंगळुरू महामार्गाजवळ असलेले हे केंद्र पुणे विमानतळापासून सुमारे ४५ किलोमीटर, रांजणगाव रेल्वे स्थानकापासून ५ किलोमीटर आणि पुण्यापासून ५० ते ५५ किलोमीटर अंतरावर आहे. जेएनपीटीपासूनही हे केंद्र १४० ते १५० किलोमीटर अंतरावर असल्याने दळणवळणाच्या दृष्टीने ते अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
 
 
एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार,Electronics Manufacturing Cluster  या प्रकल्पाच्या परिसरात एकूण जागेच्या २० टक्के भाग सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे येथे इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाची मजबूत परिसंस्था निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. लवकरच या केंद्रातील जागा वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून संपूर्ण प्रकल्प दोन महिन्यांत पूर्णपणे कार्यान्वित होईल.