माजी सैनिकानेच केली माजी सैनिकांची फसवणूक

    दिनांक :04-Jun-2026
Total Views |
*दिले नोकरीचे आमिष
 
वर्धा, 
Fraud Against Ex-Servicemen जलसंपदा विभागात नोकरीला लावून देण्याचे आमिष देऊन ३ माजी सैनिकासह एकाची दोन माजी सैनिकांनी तब्बल १३ लाखांनी फसवणूक केल्याची घटना नटाळा पुनर्वसन येथे उघडकीस आली. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी विपीन मोघे रा. म्हाडा कॉलनी व राहुल थूल रा. मानेवाडा, नागपूर यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवला आहेे.
 
 
froud
 
माजी सैनिक विवेक शुला (४२) रा. नटाळा पुनर्वसन, कारला रोड हे पावर ग्रीड कंपनी देवळी येथे सुरक्षा रक्षक म्हणून नोकरीला आहे. विपीन मोघे रा. म्हाडा कॉलनी हा सुद्धा माजी सैनिक असल्याने याच्याशी त्यांची ओळख होती. सन २०२३ मध्ये जल संपदा विभाग, नागपूर येथील कालवा निरीक्षण या पदाची जाहीरात निघाल्याने विवेक शुला यांनी त्या पदाकरिता अर्ज केला होता. त्यावेळी विपीन मोघे याने ही परीक्षा कठीण असते तुम्ही परीक्षेत पास होऊन शकत नाही, असे म्हणत आपली मंत्रालयापर्यंत ओळख आहे. आपण तुम्हाला नोकरीवर लावू शकतो. त्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील. परंतु, त्याची पोच पावती मिळणार नाही, असे सांगितले. त्यावर शुला यांनी विचार करून सांगतो, असे सांगितले. यानंतर विपीन मोघे हा त्यांना वारंवार फोन करीत होता. विपीन मोघे व आपण एकाच संघटनेत आहोत. त्याची ओळख असल्याने तो आपले काम करू शकतो, असे ठरले. यानंतर सर्व जण विपीन मोघे याला भेटले. पैशाची बोलणी झाली. त्यावेळी मोघे याने माजी सैनिकाला प्रत्येकी ९ लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले.
 
 
Fraud Against Ex-Servicemen  त्यावर शुला यांनी माझ्याकडे एवढे पैसै नसल्याचे सांगितले. त्यामुळे मोघे याने ३ लाख रुपये आधी द्या, यादीत नाव आल्यानंतर ३ लाख आणि जॉईनिंग लेटर आल्यानंतर ३ लाखांची मागणी केली. २४ डिसेंबर २०२३ रोजी शुला, परिक्षीत डांगे व महेंद्र बावने यांनी प्रत्येकी ३ लाख रुपये तसेच त्याचा साळा अमित पिडीया याचे ४ लाख, असे १३ लाख रुपये विपीन मोघे यांना दिले. यानंतर जलसंपदा विभागाची परीक्षा झाली. पण यांना परीक्षेत मार्क कमी असल्याने यादीत नाव आले नाही. त्यानंतर दुसरी यादी आली. त्या यादीतसुद्धा त्यांचे नाव आले नाही. यामुळे विपीन मोघे याला विचारले असता त्याने तुम्हाला सरळ मेल येईल, असे सांगितले. परंतु, तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. त्याच्याकडे पैशाची मागणी केली असता त्याने टाळाटाळ केली. यामुळे विवेक शुला व इतर माजी सैनिकांनी जिल्हा सैनिक कार्यालय येथे सुद्धा तक्रार केली आहे.
 
 
त्यावेळी रामनगर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलविले असता तो राहुल थूल रा. ओंकारनगर नागपूर याला सोबत घेऊन आला होता. चौकशी दरम्यान, त्याने एका कोर्‍या कागदावर पैसे घेतल्याचे कबुली दिली दोन पंचासमक्ष लिहून दिली. त्यांना ३ धनादेश देऊन ठरावीक तारखेला बँकेत टाकण्यास सांगितले. परंतु, धनादेश वठलेच नाही. तक्रारीवरून पोलिसांनी विपीन मोघे आणि राहुल थूल यांच्या विरूद्ध गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणी ३० जानेवारी २०२६ रोजी उप जिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्रीपती मोरे यांनीही पोलिस निरीक्षक रामनगर यांना पत्र देऊन कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.