रहस्य, भय, थरार! घबाडकुंडचा 'खतरनाक ट्रेलर'

    दिनांक :04-Jun-2026
Total Views |
मुंबई
Ghabadkund मराठी चित्रपटसृष्टीत रहस्य आणि थराराचा अनोखा अनुभव देण्याचा प्रयत्न करणारा आगामी ‘घबाडकुंड’ हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटातील कलाकारांचे लूक सोशल मीडियावर व्हायरल होत असून प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर या चित्रपटाचा अधिकृत ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला असून त्यातील भयावह दृश्ये, रहस्यमय वातावरण आणि थरारक प्रसंगांमुळे प्रेक्षकांच्या अंगावर काटा येत आहे.
 

Ghabadkund, Ghabadkund film, 
प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये रहस्य, भय आणि अनपेक्षित घटनांचा एकत्रित अनुभव पाहायला मिळतो. विशेषतः ट्रेलरमधील काही दृश्ये आणि १ मिनिट ४३ सेकंदाच्या आसपास येणारा भाग प्रेक्षकांना हादरवून टाकणारा असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. चित्रपटाची कथा एका गूढ आणि धोकादायक प्रवासाभोवती फिरते, ज्यामध्ये सहा जण एका रहस्याचा शोध घेण्यासाठी निघतात. मात्र या प्रवासात त्यांना भीतीदायक आणि अनाकलनीय घटनांचा सामना करावा लागतो.
मराठी चित्रपटसृष्टीत सतत Ghabadkund  नवे प्रयोग होत असून ‘घबाडकुंड’ हा त्याचाच एक भाग असल्याचे मानले जात आहे. या चित्रपटातून प्रेक्षकांना एका वेगळ्या कल्पनाविश्वात नेण्याचा प्रयत्न करण्यात आला असून रहस्य आणि थराराचा नवा अनुभव देण्याचा दावा निर्मात्यांनी केला आहे. ट्रेलरमधील प्रत्येक दृश्य कथानकातील गूढता अधिक गडद करत असल्याचे दिसून येते.चित्रपटाच्या निर्मितीमागे दिग्दर्शक प्रीतम एस. के. पाटील यांचे दिग्दर्शन असून निर्माते डॉ. रसिक कदम यांचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे. या चित्रपटात शशांक शेंडे, संदीप पाठक, देवदत्त नागे, कुशल बद्रिके, प्राजक्ता हनमघर, स्मिता पायगुडे-अंजुटे, वैष्णवी कल्याणकर, रॉकी देशमुख, आरोही भोईर आणि योगेश प्रकाश तनपुरे यांसारख्या कलाकारांचा समावेश आहे.‘घबाडकुंड’मधून प्रेक्षकांना कल्पनेपलीकडचे आणि थराराने भरलेले एक नवे विश्व अनुभवायला मिळेल, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे. ट्रेलरच्या जोरदार प्रतिसादानंतर चित्रपटाबाबतची उत्सुकता अधिकच वाढली असून हा चित्रपट प्रेक्षकांना मोठे सरप्राईज देणार असल्याचे संकेत मिळत आहेत.