हे काय भलतेच...! गुगलला हवेत 32 दशलक्ष डास!!

    दिनांक :04-Jun-2026
Total Views |
न्यूयॉर्क
Google,Mosquitoes ऋतू कोणताही असो डासांचा त्रास आजकाल जवळपास वर्षभर जाणवतो. आता तर पावसाळ्यात याचा प्रादुर्भाव वाढतो. रात्रीची झोप उडवणाèया या छोट्या कीटकांमुळे केवळ चिडचिड होत नाही, तर अनेक गंभीर आजारांचाही धोका निर्माण होतो. जगभरातील आरोग्य संस्था डासांमुळे पसरणाèया रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध उपाय शोधत आहेत. मात्र, आता या लढाईत तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी गुगलच्या मूळ कंपनीने एक अनोखी योजना समोर आणली आहे. ज्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे, सोबतच गुगल असं का करणार आहे? असा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे.
 
 
google
Google,Mosquitoes गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटच्या लाइफ सायन्सेस विभागाने काही वर्षांपूर्वी डिबग नावाचा विशेष प्रकल्प सुरू केला होता. या प्रकल्पाचा उद्देश डासांमुळे पसरणाèया धोकादायक रोगांवर नियंत्रण मिळवणे हा आहे. यासाठी कंपनीने अमेरिकेतील कॅलिफोर्निया आणि फ्लोरिडा राज्यांमध्ये पुढील दोन वर्षांत तब्बल 32 दशलक्ष म्हणजेच 3.2 कोटी विशेष डास सोडण्याची परवानगी मागितली आहे.
Google,Mosquitoes या योजनेतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोडले जाणारे डास हे नर डास असतील. विशेष म्हणजे नर डास माणसांना चावत नाहीत. फक्त मादी डास रक्त शोषतात आणि त्यांच्यामार्फत अनेक रोग पसरतात. त्यामुळे या प्रकल्पामुळे नागरिकांच्या डास चावण्याच्या समस्येत वाढ होणार नाही.
Google,Mosquitoes हे डास करणार तरी काय?
या डासांमध्ये वोल्बाशिया नावाचा नैसर्गिक जीवाणू असतो. जेव्हा हे संक्रमित नर डास जंगलातील किंवा नैसर्गिक वातावरणातील मादी डासांशी संयोग करतात, तेव्हा तयार होणारी अंडी उबवत नाहीत. परिणामी पुढील पिढीतील डास जन्मालाच येत नाहीत आणि हळूहळू त्या भागातील डासांची संख्या कमी होऊ लागते.
Google,Mosquitoes या प्रकल्पाचा मुख्य उद्देश वेस्ट नाईल व्हायरस आणि सेंट लुईस एन्सेफलायटिससारख्या डासांमुळे पसरणाèया रोगांवर नियंत्रण मिळवणे हा आहे. विशेषतः वेस्ट नाईल व्हायरस हा अमेरिकेतील सर्वाधिक आढळणाèया डासजन्य रोगांपैकी एक मानला जातो. त्यामुळे डासांची संख्या कमी करणे हा या समस्येवर उपाय म्हणून पाहिला जात आहे.

Google,Mosquitoes कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोट्सची मदत
लाखो डासांची पैदास करणे आणि त्यातील फक्त नर डास निवडणे हे अत्यंत जटिल काम आहे. यासाठी कंपनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), अत्याधुनिक रोबोट्स आणि स्वयंचलित यंत्रणांचा वापर करत आहे. विशेष सिस्टीमच्या मदतीने नर आणि मादी डास वेगळे केले जातात. त्यानंतर योग्य ठिकाणी या डासांचे नियंत्रित पद्धतीने वितरण केले जाते.