अहमदाबाद,
Bangladeshis arrested अहमदाबाद पोलिस आणि गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने ऑपरेशन डेल्टा हंट मोहीम राबवत राज्यातील विविध भागांतून 501 बांगलादेशी नागरिकांना अटक केली. प्राथमिक तपासात हे सर्व बेकायदेशीर बांगलादेशी नागरिक असल्याचे निष्पन्न झाले आहे.
गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांनी गुरुवारी राज्यभरात घुसखोरांविरोधात सुरू असलेल्या ऑपरेशन डेल्टा हंट या कारवाईबद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितले की, गुरुवार राज्यभरातून 501 बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी चांदोल, गुलाबनगर आणि खोडियारनगरसह शहरातील अनेक भागांमध्ये घुसखोरांविरोधात मोठी शोधमोहीम राबवली. ही मोहीम अजूनही सुरू असून, राज्याच्या अनेक भागांमध्ये राबवली जात आहे. अनेक घुसखोरांकडे फसवणूक करून मिळवलेली आधार कार्ड होती. यामुळे कागदपत्रांच्या बनावटीच्या नेटवर्कची आणि भारतात त्यांच्या वास्तव्यासाठी वापरल्या जाणाèया पद्धतींची सखोल चौकशी सुरू आहे.
सह पोलिस आयुक्तBangladeshis arrested शरद सिंघल यांनी सांगितले की, राज्यव्यापी ऑपरेशन डेल्टा हंट मोहीमेत अटक करण्यात आलेल्या 501 लोकांची ओळख बांगलादेशी नागरिक म्हणून पटली आहे. यापैकी अनेकांनी बेकायदेशीरपणे भारतीय आधार कार्ड मिळवले होते. ही कागदपत्रे कोणी तयार करून दिली याचा आम्ही तपास करत आहोत. हे लोक भारतात कसे आले, ते काय काम करत होते आणि पैसे पाठवण्यासाठी ते कोणत्या माध्यमांचा वापर करत होते, याचाही तपास केला जात आहे.