नागपूर,
hindi morbhawan nagpur विदर्भ हिंदी साहित्य सम्मेलनच्या वतीने नवोदित प्रतिभांना समर्पित उपक्रम ‘उभरते सितारे’ चे आयोजन हिंदी मोर भवन येथील उत्कर्ष हॉलमध्ये करण्यात आले. कार्यक्रमाचा विषय ‘सांस्कृतिक वारसा’ असून यामध्ये शैक्षणिक, ज्ञानवर्धक आणि संगीतमय सादरीकरणांनी रंगत आणली.
कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आणि काउंसलर हरमीत कौर लांबा उपस्थित होत्या. त्यांनी मुलांना मार्गदर्शन करताना सांगितले की मुले पालकांना पाहून शिकतात, त्यामुळे पालकांनी स्वतःच्या वर्तनातून चांगला आदर्श निर्माण करणे आवश्यक आहे. hindi morbhawan nagpurमोबाईलचा अति वापर कमी करून मुलांना मैदानावर खेळण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि घरातील वातावरण सकारात्मक ठेवणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.कार्यक्रमात मुलांनी ‘सांस्कृतिक वारसा’ या विषयावर नृत्य, गीत आणि विचारमंथनातून अप्रतिम सादरीकरण केले. विविध अकॅडमीतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य आणि गीतांनी उपस्थितांची मने जिंकली.पालकांनीही मुलांच्या सादरीकरणाचे भरभरून कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली मदारे यांनी केले तर संयोजक युवराज चौधरी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
सौजन्य:गजेंद्र डोळके,संपर्क मित्र