कुवेत
Iran-America war इराण विरुद्ध अमेरिका युद्धसंघर्ष सुरू असतानाच आता कुवेतमध्ये हल्ला सुरू झाला आहे. एक भयंकर ड्रोन किती धोकादायक ठरू शकतो आणि इराणची ताकद काय आहे हे पुन्हा एकदा संपूर्ण जगानं पाहिलं. तर इराणी ड्रोननं अक्षरश: कुवेत एअरपोर्टवर विद्ध्वंस माजवला आहे. हल्ला करून संपूर्ण एअरपोर्ट नष्ट करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये एअरपोर्टचं मोठं नुकसान झालं आहे. हा हल्ला कॅमेèयात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Iran-America war अमेरिका आणि इराण यांच्यात धुमसणाèया युद्धाच्या भडक्याने आता आखाती देशात अत्यंत भयंकर रुप धारण केलं आहे. कुवेत आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका इराणी आत्मघाती ड्रोनने थेट टर्मिनल-1 वर हल्ला केला. या हल्ल्यानंतर संपूर्ण विमानतळ आगीचा गोळा बनल्याचं दिसत आहे. इतकंच नाही तर विमानतळाचं छतही कोसळलं आहे.
Iran-America war या भीषण हल्ल्यात एका भारतीय व्यक्तीचा मृत्यू झाला असून 63 लोक जखमी झाले आहेत. कुवेत सरकारच्या नागरी उड्डाण महासंचालनालयाने विमानतळाच्या टर्मिनल-1 वरील सीसीटीव्ही कॅमेèयांचे लाईव्ह सर्व्हिलन्स फुटेज जारी केलं.