नागपूरला औषधमंडी सुरू करा

    दिनांक :04-Jun-2026
Total Views |
भारतीय किसान संघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पारवा, 
Medicine Market in Nagpur विदर्भातील पारंपरिक कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकèयांना सातत्याने संकटांचा सामना करावा लागत आहे. अशा वेळी त्यांना सक्षम व खात्रीशीर पर्याय देणाèया औषधी वनस्पतींच्या पिकांसाठी उपराजधानी नागपूर येथे केंद्रीय औषधमंडी व जिल्हास्तरावर शासकीय प्रक्रिया केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी भारतीय किसान संघ विदर्भ प्रांताचे युवा प्रमुख राम जिल्लडवार यांनी केली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नागपूरचे विभागीय आयुक्त यांना निवेदन पाठवण्यात आले आहे.
 

Plants 
 
Medicine Market in Nagpur  मनरेगा योजनेला उत्तम प्रतिसाद, पण बाजारपेठेचा अभाव शासनाने मनरेगा अंतर्गत पडित जमिनीवर औषधी वृक्ष लागवडीची अत्यंत स्तुत्य योजना सुरू केली आहे. या योजनेला प्रतिसाद देत यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर आर्णी विधानसभा क्षेत्रासह विदर्भातील आदिवासी व सर्वसामान्य शेतकरी औषधी वनस्पती व फुलपिकांच्या लागवडीकडे वळले आहेत. विदर्भातील हवामान व निसर्ग या पिकांसाठी अत्यंत पूरक आहे. परंतु, दुर्दैवाने स्थानिक पातळीवर कोणतीही हक्काची बाजारपेठ किंवा शासकीय खरेदी केंद्र उपलब्ध नाही. यामुळे स्थानिक व्यापाèयांकडून शेतकèयांची मोठी आर्थिक पिळवणूक होत आहे. या अनुषंगाने भारतीय किसान संघाने नागपूर येथे केंद्रीय औषधमंडी उभारण्याची मागणी केली आहे. येथे औषधमंडी उभारल्यास देशभरातील नामांकित कंपन्या व खरेदीदार थेट विदर्भातील शेतकèयांशी जोडले जाणार आहेत. तसेच जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये औषधी वनस्पतींच्या खरेदीसाठी स्वतंत्र कक्ष किंवा शासकीय खरेदी केंद्र सुरू करा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.