देशातील हजारांवर ‘अल्पवयीन चिमुकल्या’ गेल्या कुठे?

- पश्चिम बंगालमधून सर्वाधिक अल्पवयीन मुली बेपत्ता

    दिनांक :04-Jun-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर, 
minor girls missing शारीरिक बदलास सुरुवात हाेत असतानाच अल्पवयीन मुली अचानक बेपत्ता हाेण्याचे प्रमाण वाढले आहे. देहव्यापार, बारबाला, बालविवाह आणि घरकामांसाठी मुलींचा वापर करण्यात येत असल्याचे जळजळीत सत्य समाेर आले आहे. देशभरातून 75 हजारांवर अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या असून पश्चिम बंगालमधून सर्वाधिक 13 हजार 727 अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या आहेत. दुसऱ्या स्थानावर बिहार राज्याचा क्रमांक लागताे, हे विशेष. ही धक्कादायक आकडेवारी एनसीआरबीच्या अहवालातून समाेर आली आहे. अल्पवयीन मुलींच्या हातातही माेबाईल असल्यामुळे इंस्टाग्राम, फेसबुक, व्हाॅट्सअपच्या माध्यमातून मुली युवकांच्या प्रेमात पडतात. नकळत्या वयात प्रेमविवाहाचा निर्णय घेतात.
 
 

देशातील हजारांवर ‘अल्पवयीन चिमुकल्या’ गेल्या कुठे? 
 
 
प्रियकरासाेबत घरातून पळून जाणे, साेशल मीडियावरील संपर्क, मानवी तस्करी, प्रेमसंबंध, काैटुंबिक कलह आणि आर्थिक-सामाजिक कारणांमुळे अल्पवयीन मुली बेपत्ता हाेत आहेत. यासाेबतच अल्पवयी मुलींचे अपहरण करुन त्यांना थेट वेश्याव्यवसायात किंवा स्टेजडान्सर या व्यवसायात ढकलण्यात येते. त्यासाठीसुद्धा अल्पवयीन मुलींवर पाळत ठेवून त्यांना विविध आमिषे दाखवून जाळ्यात ओढण्यात येते. देशभरात 2024 मध्ये एकूण 75,603 अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची नाेंद आहे. अल्पवयीन मुली बेपत्ता हाेण्याच्या प्रकरणांमध्ये पश्चिम बंगाल राज्य पहिल्या स्थानावर आहे. या राज्यातून वर्षभरात 13 हजार 727 मुली बेपत्ता झाल्या आहेत. दुसऱ्या स्थानावर असलेल्या बिहारमध्ये 6 हजार 173 अल्पवयीन मुली बेपत्ता आहेत. चवथ्या स्थानावर असलेल्या राजस्थानमध्ये 6033 तर तामिळनाडूमध्ये 5789 अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची नाेंद आहे.
  
राज्यात दाेन हजारांवर मुली बेपत्ता
महाराष्ट्रात 13 ते 16 या वयाेगटातील मुलींच्या बेपत्ता हाेण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. राज्यातून गतवर्षी 2057 अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या आहेत. मुलींच्या सुरक्षेसाठी शाळा, कुटुंब, पाेलिस आणि समाज यांच्यात अधिक समन्वय आवश्यक आहे. सर्वाधिक बेपत्ता मुलीं मुंबई-पुण्यातील देहव्यापाराचे अड्डे आणि डान्सबारमध्ये काम करण्यासाठी नेण्यात येत असल्याची माहिती समाेर आली आहे.
पाेलिस ठाण्यात पालकांची कुचंबना
अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्यानंतर आई-वडिल पाेलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जातात. मात्र, पाेलिस ठाण्यात पालकांची माेठी कुचंबना हाेते. मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार घेण्यासाठी अनेकदा टाळाटाळ करण्यात येते. तसेच मुलीचा शाेध घेण्यासाठी पाेलिस गांभीर्य दाखवत नाहीत.minor girls missing त्यामुळे अनेक पालक मुलीचा शाेध लागण्याची आशा साेडून देतात. मुलींचा शाेध घेण्यासाठी पाेलिस विविध अभियान राबवितात, परंतु तपास अधिकारी गांभीर्य दाखवत नसल्यामुळे अनेक मुलींचा शाेध लागत नसल्याची माहिती समाेर आली आहे.