अनिल कांबळे
नागपूर,
betul car accident बैतूलहून नागपूरकडे येत असलेल्या कारचा भीषण अपघात हाेऊन नागपूरच्या एका महिलेचा मृत्यू झाला, तर कुटुंबातील तिघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात बैतूलजवळील नगरकाेट परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 47 वर मंगळवारी दुपारी 3.45 वाजता घडला. सारिका शुक्ला असे अपघातात मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या दुभाजकावर जाऊन जाेरदार आदळले. धडकेनंतर कार उलटली. या अपघातात कारमधील सारिका शुक्ला यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातावेळी कारमध्ये त्यांचा मुलगा अभिजित शुक्ला, मामा रितेश अवस्थी आणि त्यांचा मुलगा आदित्य अवस्थी हेही प्रवास करत हाेते. तिघांनाही गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर महामार्गावरील प्रवाशांनी तत्काळ मदतकार्य सुरू करून जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. अपघाताची माहिती मिळताच मुलताई पाेलिस घटनास्थळी पाेहाेचले आणि पुढील कारवाई सुरू केली.betul car accident बैतूल पाेलिस ठाण्याचे अधिकारी नरेंद्र परिहार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत सारिका शुक्ला यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बैतूल येथील शासकीय रुग्णालयाच्या शवविच्छेदन कक्षात ठेवण्यात आला आहे. दरम्यान, अभिजित शुक्ला हे आपल्या कुटुंबीयांसह बैतूलहून नागपूरकडे परतत असताना हा अपघात घडला.पाेलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नाेंद केली.