निकोबार बेटांचा होणार कायापालट

9 अब्ज डॉलर्सच्या प्रकल्पाला मंजुरी

    दिनांक :04-Jun-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Nicobar ग्रेटर निकोबार बेटांचा कायापालट करण्यासाठी केंद्र सरकारने 9 अब्ज डॉलर्सच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पातंर्गत अंदमान आणि निकोबार बेट समुहांना एक सागरी आणि आर्थिक केंद्रामध्ये रूपांतरित करण्यात येणार आहे.
 

Nicobar  
या बेटांवर मालवाहतुकीसाठी बंदर, लष्करी, हवाई तळ, एक ऊर्जा प्रकल्प, पर्यटनाच्या दृष्टीकोणातून पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत. त्याचबरोबर 3 लाख 50 हजार लोकांची एक टाऊनशिप देखील तयार करण्यात येईल. हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी तीस वर्षे लागणार असून पहिला टप्पा 2028 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.सध्याच्या घडीला भारतीय बंदरांवर मोठ्या जहाजांसाठी खोल पाण्यात असलेली बर्थ कमी आहेत. त्यामुळे माल कोलंबो किंवा सिंगापूरच्या समुद्री मार्गाने पाठवला जातो. यामुळे भारताचे मोठे आर्थिक नुकसान होते. ज्यावेळी ग्रेटर निकोबार प्रोजेक्ट तयार होईल त्यावेळी 14.2 मिलियन टीईयू असलेले आंतरराष्ट्रीय कंटेनर ट्रान्सशिपमेंट टर्मिनल शिपमेंटबाबतचे भारताचे दुसèया देशांवर असेले अवलंबत्व फक्त संपणार नसून हिंदी महासागरातील एक महत्वाच्या समुद्री रस्त्यावर नजर देखील ठेवता येणार आहे.

राष्ट्रीय सुरक्षेसाठी महत्त्वाची योजना
सामरिक आणि आर्थिक Nicobar विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या ग्रेट निकोबार बेटाच्या विकासाचा उद्देश हा अंदमान समुद्र आणि दक्षिण पूर्व आशियामधील भारताची उपस्थिती मजबूत करणे हा आहे. ही योजना भारताची राष्ट्रीय सुरक्षा, रणनैतिक आणि संरक्षण उपस्थिती वाढवणार आहे. हे ठिकाण मलक्काच्या अगदी जवळ आहे. मलक्का सामुद्रीधुनीतून वाहतूक करणाèया जहाजांवर नजर ठेवण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे.