निहारिका खोंदले यांना ‘धनगर रत्न’ पुरस्कार

    दिनांक :04-Jun-2026
Total Views |
नागपूर,
niharika-khondale नागपूर येथील निहारिका प्रकाशचंद्र खोंदले यांना धनगर प्रतिष्ठान, ठाणे यांच्या वतीने ‘धनगर रत्न (राजकीय क्षेत्रातील)’ पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त हा सन्मान देण्यात आला.
 
 
 
 
rita
 धनगर समाजातील महिला नेतृत्व म्हणून त्यांनी विदर्भ ते मुंबई असा संघर्षमय प्रवास करत राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. २०१९ मध्ये ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवून सुमारे ७० हजार मते मिळवत तिसरे स्थान मिळवले होते. niharika-khondale धनगर समाजातील महिला उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढविण्याची त्यांची भूमिका ऐतिहासिक मानली जाते.भारतीय जनता पक्षाच्या मुंबई प्रदेशात विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या असून महिला सक्षमीकरण, बचत गट, प्रशिक्षण कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. संघटन कौशल्य, निवडणूक व्यवस्थापन आणि समाजकारणातील सक्रिय सहभागामुळे त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे.
सौजन्य:उज्ज्वल रोकडे ,संपर्क मित्र