न्यूयॉर्क
Peabo Bryson आंतरराष्ट्रीय संगीतविश्वातून एक दुःखद बातमी समोर आली असून, दोन वेळा ग्रॅमी पुरस्कार विजेते आणि प्रसिद्ध गायक पीबो ब्रायसन यांचे वयाच्या 75 व्या वर्षी निधन झाले आहे. डिस्नेच्या अनेक क्लासिक गाण्यांना आपल्या सुरेल आवाजाने अजरामर करणाऱ्या ब्रायसन यांच्या निधनामुळे जागतिक संगीतविश्वात शोककळा पसरली आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी एका निवेदनाद्वारे त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
ब्रायसन यांचे काही दिवसांपासून उपचार सुरू होते आणि त्यांना पक्षाघाताचा झटका आल्याचेही मीडिया अहवालांमध्ये नमूद करण्यात आले आहे. मात्र त्यांच्या कुटुंबीयांनी अधिकृत निवेदनात मृत्यूचे नेमके कारण जाहीर केलेले नाही.कुटुंबीयांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ब्रायसन यांचा “विलक्षण आवाज” पाच दशकांहून अधिक काळ अनेक अविस्मरणीय क्षणांचा भाग राहिला. त्यांच्या संगीताने प्रेमकथा, आनंदाचे प्रसंग आणि शांततेच्या क्षणांना पार्श्वभूमी दिली असून, त्यांचा वारसा पिढ्यानपिढ्या जिवंत राहील, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.पीबो ब्रायसन यांनी आपल्या कारकिर्दीत ‘ब्यूटी अँड द बीस्ट’ आणि ‘अ होल न्यू वर्ल्ड’ यांसारखी लोकप्रिय गाणी गायली असून, त्यांना 1992 आणि 1993 मध्ये दोन ग्रॅमी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या आवाजाने डिस्नेच्या संगीताला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून दिली.
यावर्षी एप्रिल Peabo Bryson महिन्यात त्यांनी आपला 75 वा वाढदिवस कुटुंबीय आणि मित्रांसोबत साजरा केला होता. त्यानंतर मे महिन्यात त्यांनी गायक जेफ्री ऑस्बॉर्नसोबत एका संगीत कार्यक्रमातही सादरीकरण केले होते. संगीत क्षेत्रातील आपल्या पाच दशकांच्या कारकिर्दीचा उत्सव साजरा करण्यासाठी ते ‘गोल्डन टच’ टूरच्या माध्यमातून आगामी कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार होते, मात्र त्याआधीच ही दुःखद घटना घडली.दरम्यान, भारतीय संगीतविश्वातही काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन झाले होते. 31 मे 2026 रोजी मुंबईतील राहत्या घरी वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लता मंगेशकर यांच्या Peabo Bryson आवाजाशी साधर्म्य असूनही स्वतःची स्वतंत्र गायनशैली निर्माण करणाऱ्या सुमन कल्याणपूर यांनी हिंदी आणि मराठी संगीतसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटवला होता.
सलग काही दिवसांत दोन महान गायकांचे निधन झाल्याने संगीतविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली असून, जगभरातील रसिकांमध्ये शोक व्यक्त केला जात आहे.