विषारी दारू प्रकरण : रसायन पुरवठादारांना अटक

    दिनांक :04-Jun-2026
Total Views |
पुणे
Pune toxic liquor case पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात २२ जणांचा बळी घेणाऱ्या विषारी दारू प्रकरणाच्या तपासात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) मोठी कारवाई करत नवी मुंबईतून दोघांना अटक केली आहे. या दोघांनी विषारी दारू तयार करण्यासाठी घातक रसायने पुरवल्याचा तपासात उलगडा झाल्याचे समोर आले आहे.
 
 
Pune toxic liquor case
अरुण जगदंब चौबे (वय ५९) आणि अभिषेक अरुण चौबे (वय २४, दोघे रा. वाशी, नवी मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात Pune toxic liquor case  न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, विषारी दारू प्रकरणाचा तपास सध्या सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. याआधी या प्रकरणात मुख्य सूत्रधार योगेश वानखेडे याच्यासह काही साथीदारांना अटक करण्यात आली होती. तपासादरम्यान आरोपींनी विषारी दारू तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या घातक रसायनांचा पुरवठा केल्याचे निष्पन्न झाल्याने सीआयडीने विशेष पथकाच्या मदतीने नवी मुंबईत कारवाई केली.अटक केल्यानंतर दोन्ही आरोपींना पिंपरी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे.ही कारवाई अतिरिक्त पोलीस महासंचालक सुनील रामानंद, विशेष पोलीस महानिरीक्षक सुधीर हिरेमठ आणि पोलीस अधीक्षक शफाकत अमान यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक शामराव काळे आणि सचिन चव्हाण यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा तपास अधिक व्यापक करण्यात आला असून रसायन पुरवठा साखळीचा शोध घेण्यावर भर दिला जात आहे.दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित कोणतीही माहिती नागरिकांकडे Pune toxic liquor case असल्यास ती तातडीने सीआयडी अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच तपासासाठी शामराव काळे आणि सचिन चव्हाण यांचे संपर्क क्रमांकही प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहेत.