आरोपी अटकेत, तरुणीची सुटका, १.७२ लाखांचा मुद्देमाल जप्त
अनिल कांबळे
नागपूर
Raid on prostitution den गुन्हे शाखा सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने धंतोली पोलिस ठाणे हद्दीतील छत्रपती चौक ते नरेंद्रनगर रेल्वे बोगद्याकडे जाणा-या मार्गावर सुरू असलेल्या बड्या देहव्यवसाय अड्डयावर छापा टाकला. कारवाईत पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून पोलिसांनी पीडित तरुणीच्या सुटकेसह १ लाख ७२ हजार ५०० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. धम्मदीप रवींद्र गजभिये (२२, भिवसनखोरी, दाभा, गिट्टीखदान) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
Raid on prostitution den माहितीनुसार, गुन्हे शाखा सामाजिक सुरक्षा विभागाचे अधिकारी व अंमलदार परिसरात गस्त घालत असताना त्यांना मिळालेल्या माहितीवरून त्यांनी धंतोली हद्दीतील छत्रपती चौक ते नरेंद्रनगर रेल्वे बोगद्याकडे जाणा-या रोडवर एका पंटरसह सापळा रचला. यादरम्यान तिथे एका दुचाकी (एमएच ४० डीजे १३७७) वरून आलेल्या आरोपीला ताब्यात घेतले. धम्मदीप हा स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी संबंधित पीडित तरुणीला देहव्यवसायाकरिता प्रवृत्त करायचा आणि तिच्याकडून हा व्यवसाय करून घ्यायचा. ग्राहकांना जाळ्यात ओढून तो हा व्यापार करत असतानाच पोलिसांनी त्याला पकडले. कारवाईत पोलिीसांनी पीडित तरुणीची सुटका करीत आरोपीच्या ताब्यातून १ हजार ५०० रुपयांची रोकड, एक मोबाईल आणि दुाकी असा १ लाख ७२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी आरोपी धम्मदीप गजभिये याच्याविरुद्ध धंतोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करीत पोलिसांनी त्याला अटक केली. आरोपीला जप्त मुद्देमालासह धंतोली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.