सेलू,
Selu: Crop Damage तालुयात गुरुवारी दुपारच्या सुमारास आलेल्या वादळात फत १० हेटर शेतातील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागाने केलेल्या पाहणीत वर्तविण्यात आला. यावेळी शेतात फळबागा, भाजीपाला व तिळ पिके होते. बहुतांश शेतकर्यांचा तीळ पीक हातात आले होते. वादळ घोराड व सेलू परिसरातच घोंघावले होते.
Selu: Crop Damage शेतातील पिकांचे फारसे नुकसान झाले नसल्याचा अहवाल तयार करण्यात आल्याचे समजते. मात्र, १० हेटर मध्येच नुकसान हे अचंबित करणारे असल्याचे बोलल्या जात आहे. सर्वाधिक नुकसान वादळामुळे केळी पिकाचे असल्याचे बोलल्या जात असताना केळीचे पाने फाटले त्यामुळे उन्हाच्या झावा केळीच्या घडाला त्रासदायक ठरतात. मग हे नुकसान नाही का, असा प्रश्न शेतकर्यांना पडला आहे. प्रत्यक्ष शेतात जाऊन कृषी विभागाने हा नुकसानीचा सर्वे केला काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. भुईमूग हे पीक येत असून तो पीक काढणीचा हंगाम आहे. मात्र, १० हेटरचे नुकसान हे अचंबित करणारे असल्याचे बोलल्या जात आहे.