शेती विकास केंद्रात आज बिजोत्सव

    दिनांक :04-Jun-2026
Total Views |
समुद्रपूर, 
sheti vikas kendra नैसर्गिक शेती, देशी बीजसंवर्धन आणि कृषी संस्कृतीच्या जतन-संवर्धनासाठी कार्यरत मगन संग्रहालय समिती, गिरडच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ‘बिजोत्सव- २०२६ कृषी संस्कृती विचार प्रेरणा मंथन’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार ५ रोजी दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत नैसर्गिक शेती विकास केंद्र, गिरड येथे करण्यात आले आहे.
 
 
farmar
 
sheti vikas kendra  अध्यक्षस्थानी ग्रामपयोगी विज्ञान केंद्र, दत्तपूरचे संचालक डॉ. सय्यद परवेज राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून तालुका कृषी अधिकारी हर्षदा खेकरे, कृषी भूषण पुरस्कार प्राप्त बीजसंवर्धक दीपक बरडे, विदर्भ नैसर्गिक शेतमाल उत्पादक किसान प्रोड्युसर कंपनीच्या संचालक शोभा गायधने, जैविक शेती शेतकरी प्रोड्यूसर कंपनीचे संचालक तुळशीदास खाडे उपस्थित राहणार आहेत. परिसरातील शेतकरी, युवक-युवती, बीजसंवर्धक आणि कृषीप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.