शूटिंगदरम्यान 'स्फोट' एकाचा मृत्यू, तीन जण गंभीर जखमी

    दिनांक :04-Jun-2026
Total Views |
चेन्नई
Killer movie shooting दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. अभिनेता आणि दिग्दर्शक एस. जे. सूर्या यांच्या आगामी ‘किलर’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झालेल्या भीषण स्फोटात एका तरुण टेक्निशियनचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
 

SJ Suryah, Killer movie shooting accident, Chennai explosion 
३ जून रोजी सकाळी चेन्नईतील पेरम्बूर परिसरातील बिन्नी मिल्स कॉम्प्लेक्समध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. एका उच्च-तीव्रतेच्या अ‍ॅक्शन सीनसाठी बॉम्बस्फोटाचा प्रसंग चित्रित करण्याची तयारी अंतिम टप्प्यात होती. या सीनसाठी स्पेशल इफेक्ट्स तयार करण्याकरिता गॅस सिलेंडरचा वापर करण्यात येत होता.शूटिंगदरम्यान अचानक गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला आणि काही क्षणांतच संपूर्ण सेटवर गोंधळ उडाला. स्फोट इतका शक्तिशाली होता की परिसरात धावपळ सुरू झाली. आगीच्या भडकेत स्पेशल इफेक्ट्स विभागातील चार टेक्निशियन गंभीररीत्या होरपळले.
या दुर्घटनेत २६ वर्षीय मदन, २७ वर्षीय शक्तीवेल, २३ वर्षीय सूर्या आणि २४ वर्षीय दिनकरन हे टेक्निशियन जखमी झाले. त्यांना तातडीने राजीव Killer movie shooting  गांधी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच २६ वर्षीय मदनचा मृत्यू झाला. उर्वरित तिघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.या घटनेमुळे चित्रपटाच्या सेटवरील सुरक्षितता उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. अ‍ॅक्शन सीन आणि स्पेशल इफेक्ट्सच्या नावाखाली काम करणाऱ्या तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.दरम्यान, या दुर्घटनेनंतर चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली असून पुढील तपास स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडून सुरू आहे.