प्रकरणांच्या वेळेत निपटारा, याचिका फेटाळली

आम्हाला वकिलांशी वैर घ्यायचे नाही -सर्वोच्च न्यायालय

    दिनांक :04-Jun-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Supreme Court सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी प्रकरणांच्या वेळेत निकाली काढण्याच्या मागणीची याचिका फेटाळून लावली. त्याचबरोबर देशभरातील न्यायालयांमध्ये स्थगिती देण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याच्या मागणीवर सुनावणी करण्यास नकार दिला.
 

Supreme Court 
यावेळी खंडपीठाने हलक्या-फुलक्या शैलीत म्हटले की, आम्हाला वकिलांशी वैर घ्यायचे नाही. आम्ही वकिलांचे मित्र आहोत.न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती व्ही. मोहन यांच्या खंडपीठासमोर ही याचिका एका वकिलाने दाखल केली होती. याचिकाकर्ता स्वतः न्यायालयात हजर झाले आणि म्हणाले की, या याचिकेचा उद्देश न्यायालयांमध्ये अनियंत्रित स्थगितीवर दिशा-निर्देश (मार्गदर्शक तत्त्वे) निश्चित करणे हा आहे.केस फ्लो मॅनेजमेंट पॉलिसी (धोरण) बनवण्याची मागणी केली होतीयाचिकेत देशभरातील सर्व न्यायालयांसाठी एकसमान राष्ट्रीय केस फ्लो व्यवस्थापन धोरण तयार करण्याची आणि लागू करण्याची मागणीही करण्यात आली होती.Supreme Court  याचिकेत म्हटले होते की, या धोरणात प्रकरणांच्या सुनावणीच्या वेगवेगळ्या टप्प्यांसाठी निश्चित वेळमर्यादा असावी. तसेच स्थगिती नियंत्रित करणे, योग्य प्रकरणांमध्ये सतत आणि दररोज सुनावणी घेणे आणि दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या व जुन्या प्रकरणांचा प्राधान्याने निपटारा करण्याची व्यवस्था करावी.मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या मागण्यांवर कोणतेही दिशानिर्देश जारी करण्यास नकार देत याचिका फेटाळून लावली.