१२ तासांत चोरीचा गुन्हा उघडकीस; दोन अल्पवयीनांना अटक

    दिनांक :04-Jun-2026
Total Views |
वर्धा, 
Theft Incident in the City शहर ठाण्यातील डी. बी. पथकाने स्टेशनफैल येथील चोरीचा गुन्हा अवघ्या १२ तासांत उघडकीस आणून दोन अल्पवयीन मुलांना अटक केली. स्टेशन फैल येथील बेबी कोराटे (६२) यांच्या यांच्या घराचे कुलूप तोडून १ लाख ८३ हजार रुपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिने चोरून नेले.
 
 
atak
 
तक्रारीवरून शहर पोलिसांनी गुन्हा नोंद केला होता. या गुन्ह्याचा तपास डी. बी. पथक करीत असताना गोपनीय माहितीच्या आधारे त्यांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. चोरीबाबत विचारपूस केली असता त्यांनी कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून चोरी गेलेला ऐवज, दोन मोबाईल, असा २ लाख १२ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई ठाणेदार संतोष ताले, पौर्णिमा राखोंडे, पोलिस उपनिरीक्षक शरद गायकवाड, गजेंद्र धर्मे, प्रशांत वंजारी, नरेंद्र कांबळे, नितीन ईटकरे, वैभव जाधव, श्रावण पवार आदींनी केली आहे.