रेल्वेत फुकट्यांकडून 423 प्रकरणात 2.12 लाखांची वसूली

    दिनांक :04-Jun-2026
Total Views |
- गोंदिया रेल्वे स्थानकावर विशेष तिकीट तपासणी मोहीम

गोंदिया, 
Ticketless Travel Incident दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळांतर्गत गोंदिया रेल्वे स्थानकावर 2 जून 2026 रोजी विशेष नाका तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. ज्यामध्ये 18 रेल्वेगाड्यांची सखोल तपासणी करण्यात आली असता विनातिकीट व अनियमित प्रवास करणार्‍या प्रवाशांविरुद्ध कारवाई करून विविध प्रकारच्या 423 प्रकरणांमधून एकूण 2 लाख 12 हजार 830 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
 
rail
 
Ticketless Travel Incident  विनातिकीट प्रवासाला आळा घालणे तसेच प्रवाशांमध्ये रेल्वे नियमांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने रेल्वे प्रशासनाच्या नागपूर मंडळांतर्गत राबविण्यात आलेल्या या विशेष नाका तिकीट तपासणी मोहिमेत 18 रेल्वेगाड्यांची तपासणी करण्यात आली. ज्यामध्ये विनातिकीट प्रवास करणार्‍या फुकट्यांकडून 203 प्रकरणात 1 लाख 41 हजार 335 रुपये वसूल करण्यात आले. तर अनियमित प्रवास करणार्‍या 127 प्रकरणात 61 हजार 895 रुपये व बुकिंग न केलेले लगेज 86 प्रकरणात 8 हजार 600 रुपये, अस्वच्छता पसरविणे 4 प्रकरण 400 रुपये तसेच धूम्रपान 3 प्रकरणात 600 रुपये असे 2 लाख 12 हजार 830 रुपये वसूल करण्यात आले. या विशेष मोहिमेत वाणिज्य विभाग आणि रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) यांचे संयुक्त सहकार्य लाभले. दरम्यान, या मोहिमेत सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक अरविंद साब यांच्या नेतृत्वाखाली 2 मुख्य वाणिज्य निरीक्षक, 9 मुख्य तिकीट निरीक्षक, 18 तिकीट तपासनीस, 3 बहुउद्देशीय कर्मचारी आणि 2 आरपीएफ जवानांनी सहभाग घेतला. नागपूर मंडळ रेल्वे व्यवस्थापक दीपक कुमार गुप्ता यांनी या मोहिमेचे कौतुक करताना अशा विशेष तिकीट तपासणी मोहिमा रेल्वेतील शिस्त राखण्यासाठी आणि रेल्वेच्या महसुलाचे संरक्षण करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे सांगितले. तर वरिष्ठ मंडल वाणिज्य व्यवस्थापक दिलीप सिंह यांनी विनातिकीट प्रवास व नियमांचे उल्लंघन करणार्‍यांविरोधातील कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच प्रवाशांनी स्वच्छता राखून रेल्वे परिसरात धूम्रपानासारख्या प्रतिबंधित कृती टाळाव्यात, असे आवाहन केले.