वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

    दिनांक :04-Jun-2026
Total Views |
मगर यांना वाडी, भेदोडकर सदर, राजपूत सक्करदरा तर कवाडे लकडगंज
 
अनिल कांबळे
नागपूर :
Transfers of Senior Police Inspectors पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांनी गुरूवारी एका आदेशान्वये शहरातील काही पोलीसठाण्यात कार्यरत वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी केले.
 
 
Transfers
 
Transfers of Senior Police Inspectors  यात सोनेगावचे नितीन मगर यांची वाडी येथे, बेलतरोडीचे मुकुंद कवाडे यांची लकडगंज, जुनी कामठीचे प्रशांत जुमडे यांची कोतवाली, गुन्हे शाखेच्या ललिता तोडासे यांची गिट्टीखदान, सदरचे राहुल तसरे यांची सोनेगाव, पाचपावलीचे यूनूस चांद शेख यांची यशोधरानगर, गुन्हे शाखा युनिट १ चे ज्ञानेश्वर भेदोडकर यांची सदर, सीताबर्डीतील गुन्हे विभागाचे सुहास राऊत यांची सीताबर्डी, मानव संसाधन शाखेचे पोलीस निरीक्षक रमेश खुणे यांची सक्करदरा, गुन्हे शाखा युनिट ४ च्या नंदा मनघाटे यांची पारडी, सक्करदराचे प्रमोद पोरे यांची वाठोडा, गिट्टीखदानचे विजय दिघे यांची जुनी कामठी, कोतवालीचे रितेश आहेर यांची बेलतरोडी आणि वाठोड्याचे नितीन चरडे यांची भांडेवाडी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.
 
 
वाहतूक परिमंडळातही फेरबदल
भांडेवाडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोदकुमार बघेले यांची लकडगंज वाहतूक परिमंडळ, गिट्टीखदानचे प्रशांत पांडे यांची सोनेगाव, गुन्हे शाखेचे राहुल शिरे यांची सीताबर्डी, सीताबर्डीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठलसिंग राजपूत यांची सक्करदरा, वाहतूक शाखा (पघात सेल)चे अरविंद महर्षी यांची एमआयडीसी वाहतूक परिमंडळ येथे बदली करण्यात आली आहे.
 
 
पोलीस उपायुक्तांचेही परिमंडळ बदलले
आदित्य मिरखेलकर यांची वाहतूक उपायुक्त, परिमंडळ ५ च्या अन्नपूर्णा सिंह यांची परिमंडळ २ च्या पोलीस उपायुक्त, परिमंडळ २ चे नित्यानंद झा यांची परिमंडळ ५, मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त दीपक अग्रवाल यांची गुन्हे (डिटेक्शन) तर गुन्हे (डिटेक्शन)चे राहुल माकणीकर यांची मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.