अग्रवालांच्या जिल्ह्यात लखानींचा विजयी जल्लोष

    दिनांक :04-Jun-2026
Total Views |
वर्धा,
celebrations by the lakhani स्थानिक स्वराज्य संस्थेच्या चंद्रपूर वर्धा गडचिरोली या तीन जिल्ह्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकीत आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे दिवशी महाविकास आघाडीचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने महायुतीचे उमेदवार अरुण लखानी हे अविरोध निवडून आलेले आहेत. वर्धेत महायुतीची संघटनात्मक बैठक सुरू असतानाच ही बातमी धडकल्याने बैठकीत जल्लोष करण्यात आला. सुधीर कोठारी यांनीही उमेदवारी मागे घेतली आहे.

victorious celebrations 
 
 
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री पंकज भोयर, उमेदवार अरुण लखानी, माजी खासदार रामदास तडस, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय गाते, आ. समीर कुणावर, आ. सुमित वानखेडे, आ. राजेश बकाने, यांच्यासह जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांची बैठक पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या निवासस्थानी झाली. 12:30 वाजताच्या सुमारास महायुतीची सभा हॉटेल हेरिटेज येथे सुरू झाली. सभेत लखानी यांना विजयी करण्याचे आवाहन सर्व वरिष्ठ नेत्यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन होत असतानाच अग्रवाल आणि कोठारी त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची बातमी धडकली. बऱ्याच वेळात ढोल ताशे बोलून सभागृहातच ढोल ताशाच्या निवादात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.celebrations by the lakhani शैलेश अग्रवाल आणि कोठारी यांचा जिल्हा वर्धा आहे. आता जिल्ह्यातच लखानी यांच्या विजयासाठीची बैठक सुरू असतानाच अग्रवाल आणि कोठारी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची बातमी धडकल्याने अग्रवाल, कोठारी यांच्या जिल्ह्यात लखानी यांच्या विजयाचा निरोप पोहोचला असेच म्हणावे लागेल. लखानी हे तरुण भारतच्या श्री नरकेसरी प्रकाशन संस्थेचे माजी अध्यक्ष आहेत हे उल्लेखनीय