जिल्हा सामान्य रुग्णालयात दुर्मिळ आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी

    दिनांक :04-Jun-2026
Total Views |
‘त्या’ गरीब रुग्णांसाठी डॉटर ठरले देवदूत
 
वाशीम,
Washim District General Hospital सरकारी दवाखान्यात जाऊन काय होणार? हा प्रश्न सामान्य माणसाच्या मनात नेहमीच घर करून असतो. मात्र, वाशीम जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉटरांच्या टीमने या प्रश्नाला आपल्या कर्तृत्वाने एक सकारात्मक उत्तर दिले आहे. केवळ उपचारच नव्हे, तर गरिबांच्या चेहर्‍यावर हसू फुलवणारे ‘देवदूत’ म्हणून या रुग्णालयातील वैद्यकीय पथक समोर आले आहे. नुकत्याच घडलेल्या एका घटनेत, ६० वर्षांच्या एका ज्येष्ठ रुग्णाच्या स्वरयंत्रावर (वोकॅल कॉर्ड) दुर्मिळ आणि अत्यंत गुंतागुंतीची गाठ काढण्याची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. वृद्धत्वामुळे आणि आजाराच्या गांभीर्यामुळे रुग्णाचे कुटुंब पूर्णपणे खचले होते. खाजगी रुग्णालयांचा महागडा खर्च त्यांच्या आवायाबाहेर होता. अशा निराशेच्या छायेखाली असताना, जिल्हा रुग्णालयाचे दार त्यांच्यासाठी ‘आशेचा किरण’ ठरले. ही शस्त्रक्रिया केवळ तंत्रज्ञानाची कसोटी नव्हती, तर ती डॉटरांच्या संयमाची आणि माणुसकीची परीक्षा होती.
 
 
General Hospital
 
Washim District General Hospital  कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. संतोष बेदरकर, डॉ. योगेश जाजू आणि डॉ. सोनाली टिकाईत यांनी अत्यंत नाजूकपणे, नसा - नसांची काळजी घेत शस्त्रक्रिया पूर्ण केली. त्यांना बधिरीकरण तज्ज्ञ डॉ. राम हजारे, डॉ. भाग्यश्री भालेराव आणि डॉ. गौरव महाजन यांनी तितयाच ताकदीने साथ दिली. शस्त्रक्रिया यशस्वी होताच, रुग्णाच्या कुटुंबियांच्या डोळ्यांत आलेले आनंदाश्रू हेच या कामगिरीचे खरे फलित होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल कावरखे आणि डॉ. अविनाश पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णालय केवळ इमारत राहिली नसून, ते सामान्य माणसाचा ‘आधारस्तंभ’ बनले आहे. पूर्वी ज्या शस्त्रक्रियांसाठी लोकांना खासगी दवाखान्यात धाव घ्यावी लागत असे, त्या आज मोफत आणि दर्जेदार पद्धतीने आपल्याच वाशीममध्ये होत आहेत. अपेंडिस, गर्भाशयाचे विकार किंवा पित्ताशयाचे खडे यांसारख्या आजारांवर आता लॅप्रोस्कोपीद्वारे विनासायास उपचार मिळणे, ही गोरगरिबांसाठी मोठी सुखद बाब आहे.
 
 
वाशीम जिल्हा रुग्णालयाने आज केवळ वैद्यकीय सेवेचा दर्जा उंचावला नाही, तर ‘सरकारी रुग्णालय म्हणजे केवळ कागदी घोडे नाचवणारी यंत्रणा’ हा समज मोडीत काढला आहे. डॉटरांनी केवळ रुग्ण बरा केला नाही, तर एका कुटुंबाला पुन्हा नव्याने जगण्याचे बळ दिले आहे. या यशस्वी कामगिरीबद्दल संपूर्ण आरोग्य विभागासह सामान्य नागरिकांमधूनही डॉटरांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.