मंगरूळनाथ,
Water Storage in the Savargaon Project तालुयातील तीर्थक्षेत्र सावरगांव कान्होबा येथे तत्कालीन लघुपाटबंधारे विभागाने बांधलेले व ४०२ हेटर सिंचन क्षमता असलेले धरण सध्याच्या मृदा व जलसंधारण विभागाच्या नाकर्तेपणामुळे शेतकर्यांच्या मुळावर उठले आहे. पोटाला भाकर देणारी शेतजमीन त्यावेळी शासनाच्या धरण निर्मितीच्या उदात्त धोरणाला दिलेल्या शेतकर्यांच्या पदरी या धरणाचे पाणी मागील वीस वर्षांपासून दुसरीकडेच वाहून जात असल्याने वैफल्य आणि निराशेच्या रूपाने पडत असल्याचे वास्तव व संतापजनक चित्र कोरडे ठाक पडलेल्या धरणाच्या चित्रावरून पुढे येत आहे.
Water Storage in the Savargaon Project दरवर्षी काठोकाठ भरणारे मात्र प्रशासकीय दिवाळखोरपणामुळे वाहून जाणारे धरण क्षेत्रातील पाण्यामुळे स्थानिक शेतकर्यांच्या डोळ्यात दरवर्षी पाणी येत असल्याचे सध्या तळ गाठलेल्या धरणाला बघितल्यावर ठळकपणे स्पष्ट होते. सन १९७७-७८ मध्ये स्थानिक शेतकर्यांकडून धरण निर्मितीसाठी शेतजमीन शासनाकडून संपादित करण्यात आली. भले मोठे धरण कानिफनाथ महाराज देवस्थानाच्या उजव्या बाजूला निर्माण करण्यात आले. धरणाच्या कालव्यांनी तब्बल १००० एकर जमीन त्यावेळेस सिंचित होत होती. सावरगांव कान्होबा, साळंबी आणि चिखलागड या गावातील शेतकरी सुद्धा या धरणाच्या त्यामुळे सुजलाम सुफलाम झाला होता. मृदा व जलसंधारण विभागाचे उपविभाग तालुयाला आहे केवळ दहा किमी. अंतरावर असलेल्या या विभागाचे उपविभागीय जलसंधारण अधिकारी कधी या धरणाच्या कालव्यांकडे फिरकल्याचे स्थानिक शेतकर्यांना आढळून आल्याचे कुणी सांगत नाही.भ्रष्ट प्रशासकीय व्यवस्थेने शेतकर्यांचा तळतळाट स्वतःवर ओढवून घेऊ नये व या धरणाच्या कालव्याची दुरुस्ती पारदर्शकपणे करून सिंचनाची सुविधा उपलब्ध न करून दिल्यास स्थानिक शेतकरी जागृत होऊन प्रशासन आणि शासनाला त्यांच्या रोशाला सामोरे जावे लागेल अशी परिस्थिती आता येथे निर्माण होण्याचे संकेत प्राप्त होत आहेत.