यवतमाळ विधान परिषद जागेवर महायुतीचा ‘झेंडा’

    दिनांक :04-Jun-2026
Total Views |
तिन्ही अपक्षांनी घेतली माघार

यवतमाळ, 
Yavatmal Legislative Council स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीत भाजपाचे बंडखोर अपक्ष उमेदवार उमरखेडचे नितीन भुतडा, काँग्रेस कार्यकर्ते व माजी दारव्हा नगर परिषद अध्यक्ष अपक्ष उमेदवार सय्यद फारूख आणि आर्णीचे नगरसेवक साजिद बेग यांनी गुरुवार, 4 जून रोजी आपले नामांकन मागे घेतले. त्यामुळे महायुतीचे अधिकृत आणि शिवसेनेचे नागपूर निवासी उमेदवार दुष्यंत सतीश चतुर्वेदी यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. दुष्यंत चतुर्वेदी हे माजी आमदार असून याच यवतमाळ जिल्हा मतदारसंघाचे त्यांनी सहा वर्षे प्रतिनिधीत्व केले आहे.
 
 
madan
 
महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी अचानक निवडणूक रिंगणातून माघार घेतल्याने महाविकास आघाडीचे नाकच कापल्या गेले आहे. त्यानंतर काँग्रेसने तीनपैकी एका अपक्ष उमेदवाराला घेरून पाठिंबा देण्याची तयारी दाखवली होती. मात्र, त्यांनीही काँग्रेसला फारसा प्रतिसाद न देता नामांकन मागे घेतल्याने काँग्रेसची खेळी निकामी ठरली. तर तिसरे आर्णी येथील अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक साजिद बेग यांनी महायुतीचा धर्म पाळत असल्याचे कारण सांगून आपली उमेदवारी मागे घेतली. तिन्ही अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्याने महायुतीचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांच्या विजयाची घोषणाच तेवढी बाकी आहे.
माजी मंत्र्यांच्या पुढाकाराने उमेदवारी मागे
Yavatmal Legislative Council  राज्यात महायुतीची सत्ता आहे. तरी देखील भाजपाचे जिल्हा समन्वयक तथा माजी जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी नामांकन दाखल केले होते. मात्र, शेवटच्या दिवशी भाजपा नेते, माजी मंत्री मदन येरावार यांच्या पुढाकाराने बंडखोर नितीन भुतडा यांनी आपली अपक्ष उमेदवारी मागे घेतली. यावेळी माजी मंत्री मदन येरावार, आमदार किसन वानखेडे आणि भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.