वजनकाट्यात तफावत..!

    दिनांक :05-Jun-2026
Total Views |
संतप्त शेतकऱ्यांचा आर्णी बाजार समितीसमोर ‘रस्ता रोखोे’

आर्णी, 
Agricultural Produce Market Committee येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांनी तूर विक्रीकरिता आणली असता तेथील वजनकाट्यात एक किलो वजनाचा फरक आढळल्याने शुक्रवार, 4 जून रोजी दुपारी 3 वाजता दरम्यान संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समिती समोर रस्ता रोखो करून बाजार समितिचा निषेध केला. यात संबधित शेतकèयांच्या तक्रारीनुसार कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन मिळाल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले.
 
 
Rasta
 
Agricultural Produce Market Committee शुक्रवारी येथे शेतकऱ्यांनी तूर विक्रीकरिता आणली होती. काही तुरीचा लिलाव झाल्यावर इलेक्ट्रिक काट्यावर 60 किलो 600 ग्रॅम वजन करण्यात येत होते. 60 किलो तुरीचे आणि 600 ग्रॅम पोत्याचे असे एकूण 60 किलो 600 वजन पाहिजे होते. परंतु शेतकरी मनोज राठोड यांच्या तुरीचे वजन 61 किलो 700 ग्रॅम मोजल्याचे राठोड यांनीच इतर शेतकऱ्यांच्या लक्षात आणून दिले. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी रस्ता रोखो करून आपला निषेध नोंदवला. यावेळी आर्णी बाजार समितीचे उपसभापती परशराम राठोड, सचिव विशाल राठोड, सहायक पोलिस निरीक्षक मिलिंद पारडकर, उपनिरीक्षक दुर्योधन राठोड, जमादार नितीन वास्टर, नफीस शेख, ऋषीकेश इंगळे, आकाश गावंडे, सचिन पिसे यांनी शेतकयांना समजावले.