दुर्दैवी घटना : विहिरीत पडून एक महिला व दोन लहान मुलांचा मृत्यू

    दिनांक :05-Jun-2026
Total Views |
पुणे,
Ambegaon Taluka Pune पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील गोहे बुद्रुक परिसरात करवंदेदरा वालकोळवाडी येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. बुधवारी घडलेल्या या घटनेत एक महिला आणि दोन लहान मुलांचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
 

Ambegaon Taluka Pune 
मिळालेल्या माहितीनुसार, अश्विनी तानाजी वालकोळी (वय 28), अक्षदा तानाजी वालकोळी (वय 5) आणि कार्तिकी तानाजी वालकोळी (वय 4) अशी मृतांची नावे आहेत. संध्याकाळच्या सुमारास या घटनेची माहिती घोडेगाव पोलीस ठाण्यात मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने तिघांनाही विहिरीतून बाहेर काढण्यात आले.यानंतर तिघांना तातडीने घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती Ambegaon Taluka Pune गावात पसरताच मोठी खळबळ उडाली असून परिसरात शोककळा पसरली आहे.शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काल तिघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. कौटुंबिक कारणांसह सर्व शक्यतांचा विचार करून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.