वाशीम,
Case of Life-Threatening Attack वाहनाला कट का माराला अशी विचारणा केल्याच्या क्षुल्लक कारणावरुन एका विशिष्ट समाजातील युवकांनी सुरेश राऊत यांच्यासह त्यांच्या परिवारावर प्राणघातक हल्ला केला. ही घटना १ जून रोजी अकोला नाका परिसरात घडली. या हल्लेखोरावर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी सकल हिंदू समाजबांधवांच्या वतीने जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढून या घटनेचा तीव्र निषेध केला. याबाबत जिल्हाधिकारी यांचेमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले.
वाशीम शहरातील अल्लाडा प्लॉट परिसरातील रहिवाशी प्रतीक राजेश राऊत हे आपल्या आईसमवेत दत्तनगरकडे जात असताना बाबर नावाच्या व्यक्तींने त्यांच्या वाहनाला कट मारला. याबाबत प्रतीक राऊत यांनी विचारणा केली असता त्यांच्यासोबत वाद घालून मारहाण करण्यात आली. या घटनेत प्रतीक राऊत यांच्या आईच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्या हाताला फॅचर झाला. यावेळी प्रतीक व त्यांच्या आईला उपचारासाठी दवाखान्यात नेण्याकरीता प्रवीण राऊत हे आपल्या नातेवाईकांसह घटनास्थळी गेले असता त्यांनाही शिवीगाळ करून अमानुष मारहाण करण्यात आली. सदर संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये स्पष्टपणे कैद झालेली आहे. या हल्ल्यामागे वैयक्तिक वादापालीकडे अन्य हेतू असण्याची शयता देखील तपासण्यात यावी, तसेच गुन्हा दाखल करत असताना त्यामध्ये दिरंगाई केली असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला.
Case of Life-Threatening Attack संबंधित आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची चर्चा नागरिकांमध्ये असून याबाबत पोलिस प्रशासनाने सखोल चौकशी करून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी. शहरातील शांतता व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी संबंधित आरोपींवर भारतीय न्याय संहितेतील लागू असलेली गंभीर कलमे, खुनाचा प्रयत्नासंबंधी लागू होणारी कलमे तसेच इतर प्रतिबंधक कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.