‘धन्वंतरी’च्या अध्यक्षपदी डॉ. ओमप्रकाश मुंधडा

    दिनांक :05-Jun-2026
Total Views |
उपाध्यक्षपदी डॉ. अनिल रोहनकर व गजानन रडके
अमरावती, 
Dhanvantari Hospital Cooperative Society स्थानिक धन्वंतरी सहकारी रुग्णालय सहकारी संस्था नवनिर्वाचित संचालकांची पदाधिकारी निवडीची प्रथम शुक्रवारी दुपारी १२ वाजता धन्वंतरी रुग्णालय निवडणूक निर्णय अधिकारी तथा अध्यासी अधिकारी सुधीर खंबायत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. धन्वंतरी सहकारी रुग्णालयाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध सर्जन डॉ. ओमप्रकाश मुंधडा तर उपाध्यक्षपदी डॉ. अनिल रोहनकर व गजानन रडके यांची अविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली.
 
 
Dhanvantari
 
Dhanvantari Hospital Cooperative Society  यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी अविनाश महल्ले, सहकार अधिकारी महेश चक्रे व उदय शिवडीकर यांनी निवडणूक प्रक्रियेमध्ये आपला सहभाग नोंदविला. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाकरिता इतर कुणाचेही अर्ज प्राप्त न झाल्याने उपरोक्त पदाधिकार्‍यांची निवड अविरोध झाल्याचे घोषीत करण्यात आले. कार्यकारी संचालक म्हणून प्रा. अशोक ठाकरे यांची निवड करण्यात आल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. मुंधडा यांनी जाहीर केले. सभेला संचालक मंडळातील डॉ. मनोज गुप्ता, डॉ. अविनाश लव्हाळे, डॉ. स्वप्नील शिरभाते, डॉ. आशिष साबू, डॉ.प्रमोद झाडे, प्राध्यापक अशोक ठाकरे, ओंकार बंड, प्रताप भुयार, राजेश गोयनका, गजानन रडके, मनीष कोरपे, संजय वानखडे, प्रकाश काळपांडे, डॉ. मीनल देशमुख, वंदना वानखडे, अरुण बांबल, डॉ. संजय खडसे, डॉ. अमित गावंडे उपस्थित होते. धन्वंतरी रुग्णालयासाठी संचालक मंडळाने आखलेल्या सर्व स्वप्नांची पूर्तता करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करू असा विश्वास यावेळी अध्यक्षांनी व्यक्त केला. ही निवडणूक प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी धन्वंतरी रुग्णालयाचे व्यवस्थापक लक्ष्मण दाभाडे, प्रशासकीय अधिकारी डॉ. साक्षी जिंतूरकर, लिपिक गजानन घोगे, संगणक ऑपरेटर कांचन ठाकरे यांनी विशेष परिश्रम घेतले.