25 मे पासून ऑनलाईन वर्गांना सुरुवात
पाणी फाऊंडेशन, कृषी विभाग, पोक्रा व उमेद यांचा उपक्रम
झूम व यूट्युबद्वारे थेट सहभागाची संधी
यवतमाळ,
Digital Farmers' Field School कृषी आयुक्त कार्यालय, पाणी फाऊंडेशन, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, उमेद अभियान आणि राज्यातील प्रमुख कृषी विद्यापीठे यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांसाठी गेल्या 25 मे पासून ‘डिजिटल शेतीशाळा 2026’ चे आयोजन करण्यात आले आहे. या डिजिटल शेतीशाळेच्या माध्यमातून खरीप हंगामातील विविध पिकांचे आधुनिक तंत्रज्ञान थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्यात येणार असून, जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या शेतीशाळेत दररोज वेगवेगळ्या पिकांनुसार तज्ञ शास्त्रज्ञ आणि कृषी अधिकारी शेतकèयांना थेट मार्गदर्शन करणार आहेत. शेतकèयांच्या मनात असणाऱ्या तांत्रिक शंकांचे निरसन झूमच्या चॅट बॉक्समध्ये किंवा यूट्युबच्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करुन करता येणार आहे. शेतकऱ्यांना घरबसल्या किंवा गावातील एकत्र ठिकाणी डिजिटल शेतीशाळेत सहभागी होता यावे यासाठी पिकांचे व वेळेचे नियोजन करण्यात आले आहे.
गावागावांत होणार प्रक्षेपणाची व्यवस्था
शेतकऱ्यांना एकत्र आणण्यासाठी ग्रामपंचायत, शाळा किंवा स्थानिक मंदिरांमध्ये संगणक, लॅपटॉप, मोबाईल अथवा प्रोजेक्टरच्या माध्यमातून या शेतीशाळेचे थेट प्रक्षेपण करण्याचे निर्देश क्षेत्रीय यंत्रणेला देण्यात आले आहेत. तसेच गावातील कृषिताई, ग्राम कृषी विकास समिती सदस्य आणि स्वयंसेवक या कामी पुढाकार घेणार आहेत. स्थानिक कृषी सेवा केंद्रांवरही हे प्रक्षेपण पाहता येईल.
झूम अॅप, यूट्युबवर थेट प्रक्षेपण
Digital Farmers' Field School या डिजिटल शेतीशाळेत झूमद्वारे सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या किंवा आपल्या परिचिताच्या मोबाईल, कम्प्यूटर किंवा लॅपटॉपमध्ये प्ले स्टोरवरुन झूम अॅप डाऊनलोड करावे अथवा गुगलवर झूम लिंक ओपन करुन मिटिंग आयडी व पासकोड समाविष्ट करून सहभागी व्हावे. तसेच यूट्युबवर थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी कृषी विभाग पाणी फाऊंडेशनच्या चॅनलला भेट देवून सहभागी व्हावे.
मोठ्या संख्येने सहभागी व्हा
खरीप हंगामात पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी दररोज या डिजिटल शेतीशाळेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन यवतमाळ जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे.