राजकीय रणनीती यशस्वी : दुष्यंत चतुर्वेदी बिनविरोध
यवतमाळ,
Dushyant Chaturvedi elected unopposed यवतमाळ जिल्ह्याला प्रगल्भ, समृद्ध आणि वैचारिक राजकारणाची परंपरा लाभली आहे. राजकीय मतभेद कितीही असले तरी जिल्ह्याच्या हिताच्या प्रश्नांवर सर्वपक्षीय नेते एकत्र येण्याची परंपरा येथे आहे. याच परंपरेची प्रचिती यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत पुन्हा एकदा आली.
राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सुरुवातीपासूनच ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले. सर्वपक्षीय नेत्यांशी असलेले त्यांचे संबंध, महायुतीतील समन्वय आणि राज्यातील वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाच्या बळावर महायुतीचे अधिकृत उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. राजकीय चुरशीची शक्यता असतानाही ही निवडणूक बिनविरोध होऊ शकली. 446 मतदार असलेल्या या मतदारसंघात सुरुवातीला निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, मंत्री राठोड यांनी समन्वयाची भूमिका स्वीकारली आणि निवडणूक अविरोध करण्यात महत्वाची भूमिका पार पाडली.
समन्वयाचा नवा पॅटर्न
Dushyant Chaturvedi elected unopposed निवडणूक झाली असती तरी मोठया फरकाने विजय महायुतीचाच झाला असता. मात्र ही निवडणूक बिनविरोध व्हावी, ही आमची सुरुवातीपासूनची भूमिका होती. मित्रपक्ष, विरोधी पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी दिलेल्या सकारात्मक सहकार्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. हा जिल्ह्याच्या प्रगल्भ आणि समन्वयी राजकारणाचा हा विजय आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केली. राठोड यांनी दाखवलेल्या राजकीय मुत्सद्दीपणामुळे राज्याला एक ‘समन्वयाचा नवा पॅटर्न’ देखील मिळाला आहे. एकूणच, या निवडणुकीत साधलेल्या सर्वपक्षीय समन्वयाची आणि संवादाच्या राजकारणाची जिल्हाभर चर्चा आहे.