राजस्थानमध्ये इबोला विषाणूचा पहिला संशयित रुग्ण

युगांडातील परदेशी महिलेला विलगीकरणात दाखल

    दिनांक :05-Jun-2026
Total Views |
जयपूर,
Ebola Case राजस्थानमध्ये इबोला विषाणूचा एक संशयित रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. इबोलासारखी लक्षणे दिसू लागल्यानंतर राजस्थानमध्ये आलेल्या युगांडातील एका परदेशी महिलेला जयपूरच्या आरयूएचएस रुग्णालयात दाखल करून विशेष विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. रुग्णालय प्रशासन आणि आरोग्य विभाग या प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. महिलेचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील एका विशेष प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे.
 

Ebola Case  
आरयूएचएस रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अनिल गुप्ता यांनी सांगितले की, सध्या इबोला संसर्गाची पुष्टी झालेली नाही. महिलेमध्ये इबोला विषाणूशी सुसंगत अशी काही लक्षणे दिसून आली आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून तिला विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. सर्व आवश्यक वैद्यकीय नियमांचे पालन केले जात आहे.
 
 
संपर्कात आलेल्यांची गोळा केली जात आहे माहिती
आरोग्य विभागाने रुग्णालयात एक विशेष देखरेख प्रणाली लागू केली आहे. त्या महिलेच्या संपर्कात आलेल्या लोकांची माहिती देखील गोळा केली जात आहे. जेणेकरून गरज पडल्यास त्यांच्यावर लक्ष ठेवता येईल. अहवाल प्राप्त झाल्यानंतरच संसर्गाची खरी व्याप्ती स्पष्ट होईल. इबोला विषाणू हा जगातील सर्वात धोकादायक संसर्गजन्य रोगांपैकी एक मानला जातो. तो संक्रमित व्यक्तीच्या शारीरिक द्रव्यांच्या संपर्कातून पसरू शकतो.
 
 
आरोग्य विभागाचा सतर्कतेचा इशारा
राजस्थानमधील वैद्यकीय आणि Ebola Case  आरोग्य विभागाने इबोला विषाणूबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे. वैद्यकीय आणि आरोग्य विभागाने राज्यातील सर्व सरकारी आणि खाजगी रुग्णालयांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. याव्यतिरिक्त, संभाव्य संसर्ग लवकर ओळखण्यासाठी विमानतळावर परदेशातून, विशेषतः आफ्रिकन देशांमधून येणाèया प्रवाशांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.